Uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : काँग्रेसमध्ये विलीन होणार? उद्धव ठाकरे थेट खासदारांच्या आरोपावर थेट बोलले, 'भाजपसोबत...'

Uddhav Thackeray On Shiv Sena UBT Congress : आज आपल्याला विरोध करतायेत तेच आहेत शिवसेनाप्रमुखांना विरोध केला. आजोबांना ज्यांनी विरोध केला गोमुत्रधारी होते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Roshan More

Uddhav Thackeray News : शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव असल्याचा आरोप बंडखोर सहा खासदारांनी केला होता. त्या आरोपाला उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, '30 वर्ष भाजपसोबत राहून त्यांच्यात विलीन झालो नाही तर काँग्रेसमध्ये विलीन काय होणार.शिवसेना विलीन होण्यासाठी जन्माला आली नाही तर हिंदुत्वासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आली आहे.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे भेटत नाही. आदित्य ठाकरे फिरत नाही. मी भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आला, त्यावेळी मी प्रत्येक लोकसभेत सहा ते दहा सभा घेतल्या, तेव्हा तुम्हाला निवडून आणलं.'

आज आपल्याला विरोध करतायेत तेच आहेत शिवसेनाप्रमुखांना विरोध केला. आजोबांना ज्यांनी विरोध केला गोमुत्रधारी होते. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे. शेंडी जाणव्याचे आहेत. जो भगव्यात भेसळ करतो तो हिंदू असू शकत नाही, उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT