Uddhav Thackray, Harshvardhan Sapkal Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election 2026: उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयानं निवडणूकच फिरली; काँग्रेस उमेदवार देणार,5 नावं आघाडीवर? 'हायकमांड'च्या जवळचा नेताही चर्चेत

MLC Election 2026: काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपली भूमिका जाहीर करताना महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल असं स्पष्ट केलं होतं. तर शिवसेनेकडून ठाकरेंऐवजी दुसरा कोणी उमेदवार दिला गेला तर आम्ही उमेदवार देणार अशी भूमिका मांडण्यात आली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक बाकी असतानाच मोठ्या राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतचा अंदाज चुकवत उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. पण दानवेंची उमेदवारीच काँग्रेसला खटकल्यामुळे विधान परिषदेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (ता.29) तातडीनं दिल्लीत पोहोचले आहेत. काँग्रेसच्या गोटात विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केल्यामुळे निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे.

काँग्रेसकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यात बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी बाळासाहेब थोरात यांचं सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या नावाला काँग्रेसच्या हायकमांडकडून पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.

काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपली भूमिका जाहीर करताना महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल असं स्पष्ट केलं होतं. तर शिवसेनेकडून ठाकरेंऐवजी दुसरा कोणी उमेदवार दिला गेला तर आम्ही उमेदवार देणार अशी भूमिका मांडण्यात आली होती. पण आता ठाकरेंनी यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतानाच अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली.

आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींशी विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याबाबत चर्चा केली आहे. यानुसार काँग्रेस आता आपला उमेदवार देणार असल्याचं समोर येत आहे. त्यात काँग्रेसकडून चर्चेत असलेल्या पाच नावांपैकी एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर होताच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्याचवेळी आम्ही विधानसभेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केल्याचं सांगितलं.

तसेच शशिकांत शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती. पण आता त्यांनीच अंबादास दानवेंना संधी दिली आहे, त्यामुळे आमची काही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे काँग्रेस विधान परिषदेसाठी खरंच आपला उमेदवार देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच आपल्या उमेदवारासाठी कशी फिल्डिंग लावणार याबाबतही चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT