Mumbai News : दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सीजेपीने नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी जंतर मंतरवरील आंदोलकांवर लाठीहल्ला झाला होता. पेलेट गनचा वापर झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला होता. तर पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप झाला होता. या विषयाला आता ठाकरे बंधूनी हात घातला आहे. पहिल्यांदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह हे स्वतःच्या सरकारचेच असंतोषाचे जनक आहेत, अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारच्या कारभारावर ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याच्या घटनेवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. केंद्र सरकारमधील 'असंतोषाचे जनक’ मोदी आणि शाहच असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलकांना वाईट पद्धतीने मारहाण केली. त्यामुळे केंद्र सरकारने आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबाची माफी मागायला हवी. दिल्लीत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे ही मुले तुम्हाला कधीच माफ करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नीटचे पेपर फुटले त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते. आंदोलन करणाऱ्यांचे परीक्षा हे एक कारण होते. याठिकाणी आंदोलन करणार तरुण होते. तरुणी होत्या. ते का आले रस्त्यावर याचे कारण सभोवतालचे वातावरण आहे. नीटचे परीक्षेचे पेपर फुटलं हे कारण होते. मात्र हे युवक सध्याच्या शिक्षण पद्धतीच्या विरोधात आक्रमक झाले होते. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.