Aditya Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Aditya Thackeray : उद्धव ठाकरेंची बॅग तपासली, पुत्र आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'दिल्लीश्वरांची आणि...'

Uddhav Thackeray Aditya Thackeray : वणी येथे सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी हॅलिपॅडवर करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तपासणीचा व्हिडिओ काढला.

Roshan More

Aditya Thackeray News: प्रचारसभेसाठी यवतमाळमधील वणी येथे जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी हॅलपॅडवर करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे संतापलेले पाहण्यास मिळाले. ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धवसाहेबांच्या सामानाची आज वणी इथे तपासणी करण्यात आली. जे कायद्याला धरुन ते झालंच पाहिजे! पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिलाय, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा! कायदा सगळ्यांना समान हवा!

आपल्या ट्विटमध्ये पुढे आदित्य ठाकरे यांनी 'महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! होऊन जाऊ दे 'दूध का दूध और पानी का पानी!' असे म्हणत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्याची मागणी केली.

हॅलिपेडवर नेमकं काय घडलं?

वणी येथे सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी हॅलिपॅडवर करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तपासणीचा व्हिडिओ काढत तपासणी करणाऱ्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्या बॅगची तपासणी केली का? म्हणून विचारणा केली.

खासदार कोल्हे यांची बॅग तपासली

खासदार अमोल कोल्हे हे प्रचासाठी सांगली जिल्ह्यात आहेत. विटा येथे यांच्या देखील बॅगची तपासणी करण्यात आली. कोल्हे यांनी ट्विट करत आपल्या बॅगची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.

तसेच , विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली.नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT