Nagpur News : राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याने दोन गट पडले आहेत. त्यातच सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागा जिंकता आल्या. महाविकास आघाडीकडे विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याएवढेही संख्याबळ नाही. त्यातच आता अधिवेशनाच्या तिसऱ्यादिवशी विधीमंडळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार पुढे बसलेले आहेत. थेट पुढच्या रांगेत आमदार बसल्याने काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना मागे बसावे लागत असल्यानी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धाव घेतली आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या दोन गट पडले आहेत. त्यामध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष सोबत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस मित्रपक्ष आहेत. पण विधिमंडळात आसन व्यवस्थेवरुन त्यांच्या मैत्रीला कोणाची तर नजर लागल्याचे दिसत आहे.
विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी आसन व्यवस्थेवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाल्याचे समजते. काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्यांसह काही आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. विधिमंडळात ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांची पुढील जागेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी फक्त ४ आमदारांना पुढे जागा दिली आहे. हे काँग्रेस आमदारांना पटलेले नाही. त्यांना सहनही करता येत नाही.
विधानसभेतील संख्याबळ पाहिले, तर महाविकास आघाडीचे फक्त 46 आमदार आहेत. यात शिवसेनेचे सर्वाधिक 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. महायुतीचे संख्याबळ 240 पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार बैठक व्यवस्था असणे गरजेचे आहे.
विधिमंडळात कामकाजावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या कनिष्ठ आमदारांमागे बसावे लागत आहे. म्हणून त्यांनी बुधवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आसन व्यवस्थेबाबत टीकाही केली. त्यानंतर या बैठक व्यवस्थेबाबत काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.