Umesh Patil Rejoins NCP sarkarnama
महाराष्ट्र

Umesh Patil : मोहोळच्या आखाड्यातील मातब्बर नेते राजन पाटलांना भिडणाऱ्या उमेश पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'शरद पवारांचा आमदारही...

Umesh Patil Rejoins NCP Praised : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस उमेश पाटील यांनी आपल्या मुख्य प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत राजन पाटील यांच्या विरोधात उमेश पाटील यांनी काम केले.

Roshan More

Umesh Patil News : विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते यांनी आपल्याच पक्षातील राजन पाटील यांना विरोध केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेश पाटील यांनी आपल्या मुख्य प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले असताना मोहोळ मतदारसंघात मात्र त्यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला.

या उमेदवाराच्या विरोधात उमेश पाटील यांनी उघडपणे काम केले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे विजयी झाले. राजू खरे आपलाच उमेदवार होता. त्यांना आपणच निवडून आणल्याचे उमेश पाटील यांनी ट्विट करत आज (बुधवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

उमेश पाटील यांनी आज (बुधवारी) पुन्हा 'देवगिरी'वर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबाबत ट्विट करत उमेश पाटील यांनी म्हटले आहे की, 'माझा देवगिरी येथे सर्व मंत्री,आमदार व पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे.मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते...फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती..इतकच'

उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी मिळून 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.अजितदादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले.'

कुठल्याही पक्षात गेलो नव्हतो

'विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता.परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता.सोलापुर जिल्ह्यातील "मोहोळ विधानसभा" या राखीव मतदारसंघा मधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता.', असे उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT