Shivsena Politics : उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या खासदारांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू होती. यामध्ये ओम राजेनिंबाळकर आणि संजय जाधव यांची नावे आघाडीवर होती. केंद्रात शिंदेंच्या शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होमार आहे.
दरम्यान, ओम राजेनिंबाळकर आणि संजय जाधव यांची नावे मागे पडल्याची चर्चा आहे. ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या खासदारांना लगेच मंत्रिपद देऊ नये, अशी पक्षात अंतर्गत चर्चा आहे. त्यातच एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे मंत्रिपद फिक्स मानले जात आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव आघाडीवर आहे.
'दिव्य मराठी' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ओम राजेनिंबाळकर यांनी ऐनवेळी संदिग्ध भूमिका घेतली. त्यामुळे त्यांची मनधरणी करत त्यांना सोबत घेण्यात आले. दरम्यान, बंडखोरीच्या वेळी ठाम भूमिका घेतलेल्या नेत्यांचे पक्षात राजकीय वजन ठरणार आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठवंताना आधी पद देत एकनाथ शिंदे संदेश देऊ इच्छित असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंसोबत ओम राजेनिंबाळकरांची भूमिका ही त्यांच्या मंत्रिपदासाठी मोठी अडचण ठरल्याची चर्चा आहे. ओम राजेनिंबाळसर सोबत आले नसते तर बाकी खासदार अपात्र ठरण्याचा धोका होता. त्यांनी थेट शिंदेसोबत जाण्याचा निर्णय न घेता आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगत टेन्शन वाढवले होते. मात्र, त्यांची ही तळ्यातमळ्यात भूमिका शिंदेंना आवडली नसल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.