Ahilyanagar district news : सार्क व्हिसा अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी त्यांची मायदेशी रवानगी करावी, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यात अहिल्यानगर जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिक आढळले असून, त्यात 13 महिलांचा समावेश आहे. या 13 महिलांचे माहेर पाकिस्तान असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, या महिलांचा विवाह भारतीय नागरिकांशी झाला आहे. यातील तिघांचे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. देशभरात संतापाची लाट आहे. पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पोलिस (Police) दलाने घेतलेल्या शोधमोहिमेत 14 पाकिस्तानचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याचे आढळले.
या 14 जणांमध्ये एक पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला पाकिस्तानच्या (Pakistan) नागरिक असून, त्या विवाह करून भारतात आल्या आहेत. म्हणजे, पाकिस्तान त्यांचे माहेर आहे, तर भारत हे सासर ठरतं. एक पाकिस्तानी नागरिक असून, त्याने भारतीय महिलेशी विवाह करून आलेला आहे. या 14 जणांपैकी केवळ तिघांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केलेला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिकांपैकी 11 जण अहिल्यानगर शहरात आहेत. तर तीन जण श्रीरामपूर तालुक्यात आहेत. एक महिला 1959 मध्ये अहिल्यानगरमध्ये आलेली आहे. सर्वांत अलीकडे पाकिस्तानमधून अहिल्यानगर शहरात आलेली महिला 2011 मध्ये आलेली आहे. चौदापैकी काही जण हिंदू आहेत.
सन 2018 पासून अल्पमुदतीच्या व्हिसावर एकही पाकिस्तानी नागरिक अहिल्यानगर जिल्ह्यात आलेला नाही. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर अहिल्यानगरमध्ये आलेल्या 14 जणांच्या व्हिसाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली आहे. सध्याच्या देश सोडण्याच्या आदेशात दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा समावेश नसल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.