Police commissioner Deepak, Police drunk liquer in police chowki News Pande, Nashik police latest news
Police commissioner Deepak, Police drunk liquer in police chowki News Pande, Nashik police latest news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आयुक्त पांडे संतापले, चौकीत दारु पिणारे ४ पोलिस सस्पेंड!

Sampat Devgire

नाशिक : शहरातील (Nashik) दादोजी कोंडदेव नगर चौकीत दारूची पार्टी करणाऱ्या पोलिसांवर (Police) हे प्रकरण चांगलेच शेकले आहे. या बाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) चांगलेच संतापले. पोलिस असे अशोभनिय काम करतातच कसे? असा प्रश्न करून या चार पोलिसांनी त्यांनी घराच रस्ता दाखवला. (Police commissioner suspends 4 police drink liquer in chowki)

या प्रकरणाची चर्चा झाल्यावर शहरातील आमदार सीमा हिरे यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. याबाबत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. पोलिसांनी तक्रार घेऊन आलेल्या नागिरकांनाच वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले. दुपारी पोलिसांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर आयुक्तांनी तातडीने या चार पोलिसांना निलंबीत केले. तसेच शहरातील सर्वच चौक्यांचा आढावा घेऊन अनावश्यक चौक्या बंद कराव्यात. कोणत्याही चौकीत नियमबाह्य वर्तन चालणार नाही अशी तंबीही दिली. (Police drunk liquer in police chowki News Updates)

काय आहे प्रकरण...

शहरातील डी. के. नगर पोलिस चौकीत काल रात्री पोलिसांची मद्य पार्टी रंगली. नागरिकांच्या हे निर्दशनास आले. त्यांनी त्याचे व्हीडीओ चित्रण केले. यावेळी पळून जाणाऱ्या एका पोलिसांस पकडून त्याचे चित्रण करीत नागरिकांनी त्याला चौकीत डांबले. वरिष्ठ अधिकारी आल्यावर पोलिसांवर कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन तास हा गोंधळ सुरु होता.

बिहार व कायदा सुव्यवस्थेत पिछाडीवर असलेल्या राज्यांनाही लाजवेल अशी ही घटना आहे. त्यात नाशिकने त्या सगळ्यांना मागे टाकले. त्यामुळे शीस्त व प्रशासकीय कारवाईत नावलौकीक असलेले पोलिस आयुक्त दीपक पांडे याबाबत काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Nashik police latest news)

याबाबतची माहिती अशी की, काल रात्री अकराला गंगापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डी. के. नगर भागात परिसरातील नागरिकांना टवाळखोर युवक त्रास देत होते. त्यामुळे तो पोलिस चौकीत तक्रार करण्यास गेला होता. तो तक्रार करण्यास गेला असता, त्याला चार पोलिसचौकीतच दारू पीत बसलेले आढळले. त्याने त्यांना आपली तक्रार सांगून चौकशी केली. तेव्हा या पोलिसांना राग आला. त्यांनी त्याला चौकीत बोलावून दिवे बंद करून मारहाण केली. त्यानंतर हा युवक बाहरे आला असता त्या भागातील नागरिक देखील आले होते. त्यांनी मोबाईलद्वारे दारु पिणाऱ्या या पोलिसांचे चित्रण केले होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT