नाशिक : कोरोनात (Covid19) अनाथ झाल्याने ‘पोरकेपणाची सल' अनुभवणाऱ्या ५६ बालकांना जिल्ह्यातील ४० महसूल आधिकाऱ्यांनी दत्तक (Adopt) घेतले आहे. जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख महसूल आधिकाऱ्यांनी (Officers) कोरोनाने निर्माण केलेली पोकळी भरुन काढण्याचे ठरविले आहे. निराधार बालकांचे कायमस्वरुपी मित्ररुपी शाश्वत पालक होण्याचा या आधिकाऱ्यांचा निर्णय अनुकरणीय ठरावी, अशीच ही उदाहरणं आहेत.
यात, स्वत: जिल्हाधिकारी सूरज मांढरे, दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदारांपर्यंत ४० आधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना महामारीचा अनपेक्षित धक्का प्रत्येकाला खुप काही शिकवून गेला. अनेकांना तर कायमचा पोरकं करुन गेला. कधीही भरुन न येणारी ही पोरकेपणाची उणीव भरुन काढण्यासाठी जिल्ह्यातील महसूल आधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी दर्जाच्या आधिकाऱ्यांनी एक व दोन पालक गमावलेल्या ५६ बालकांना दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी दोन जुळ्या मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यात, शासकीय योजनां व्यतिरिक्त संबंधित मूलांच्या अडी-अडचणींवर हे आधिकारी संबधित मूल सज्ञान होईपर्यंत कायम लक्ष ठेवून शाश्वत स्वरुपाची मदत करणार आहेत. इतर ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावे, असा हा उपक्रम आहे.
स्वखर्चातून शाश्वत आधार
दोन्ही पालक गमावलेल्या निराधारांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून पाच लाखांची मुदतठेव, एक पालक गमावलेल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्यासाठी वर्षाला १० हजारांची शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे. पण, निराधारांना पैसे दिले म्हणजे त्यांच्या आयुष्यातील पोरकेपण दूर होईल, असे नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन वात्सल्य योजने’तून ४६ शासकीय योजनांचा लाभ द्यायचा, सगळ्यांना सानुग्रह मदत, दर महिण्याला अकराशे रुपये शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्यासाठी १० हजार रुपये, तसेच स्व-खर्चातून पालकत्वाच्या भूमिकेतून या अनाथ बालकांच्या शाश्वत पुनर्वसनासाठी हे आधिकारी मूलं सज्ञान होईपर्यंत किंवा कदाचित त्यापुढेही कायमस्वरुपी मित्ररुपी पालक बनून राहणार आहेत.
यांचा आहे सहभाग...
सुरज मांढरे (जिल्हाधिकारी), अप्पर जिल्हाधिकारी- दत्तप्रसाद नडे, मायादेवी पाटोळे, उपजिल्हाधिकारी- नितीन मुंडावरे, वासंती माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवड डोईफोडे, निलेश श्रिंगी, जिल्हा पुरवठा आधिकारी- अरविंद नरसीकर, प्रांताधिकारी- चंद्रशेखर देशमुख, अर्चना पठारे, वेदिका हुजरे, विजयानंद शर्मा, विकास मिना, तहसीलदार अनिल दौडे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.