Dhule grampanchyat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Voting For grampanchyat : नववधूने बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

Voting For grampanchyat : पहिल्यांदाच आपला मतदानचा हक्क बजावला

सरकारनामा ब्यूरो

धुळे : राज्यातील तब्बल साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळीच मतदानला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवरच धुळ्यातील एका नववधूने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या नववधूचे राज्यभर कौतुक करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान (Voting) होत असून दहा ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ११८ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत असून मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र सध्या चर्चा रंगलीय ती धुळ्यातील फागणे येथील एका नववधूची.

फागणे येथे ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे. फागणे या गावातील सीमा कुंभार या नववधूने प्रथम आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढली. यावेळी तिने पहिल्यांदाच आपला मतदानचा हक्क बजावला. तसेच प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असंही ती यावेळी म्हटली. (grampanchyat News)

दरम्यान, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे आता गुलाल कुणाचा? हे दोन दिवसांनी पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT