Shinde-Thackray Politics: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde-Thackray Politics: दादा भूसेंशी वैर? ठाकरे गटाच्या उपनेत्यासह ३२ जणांवर गुन्हा दाखल

काही दिवसांतच हे प्रकरण काहीसे शांत झाले असे वाटत असतानाच....

सरकारनामा ब्युरो

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर फसवणूक करुन दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे यांच्या रेणूकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर ३२ कोटींची थकबाकी आहे. पण बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी आयोशानगर पोलिस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्यामागे आणखी एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. (A case has been registered against 32 people including the deputy leader of the Thackeray group)

मिळालेल्या माहितीनुसार,काही महिन्यांपूर्वी महात्मा गांधी विद्या मंदीर संचलित आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी देतो,असे आश्वासन देत हिरे यांच्या काही समर्थकांनी लोकांकडून लाखो रुपये उकळले होते.पण नोकरी तर दूरच पण त्यांना पैसेही परत करण्यात आले नाहीत.त्यावेळी अद्वय हिरेंविरोधात लोक चांगलेच आक्रमक झाले होते.

काही दिवसांतच हे प्रकरण काहीसे शांत झाले. पण गेल्या महिन्यात अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर हिरे यांनी थेट दादा भूसे यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली.विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून मालेगावात अद्वय हिरे आणि दादा भूसे यांच्यातील वैर होते.पण हिरे यांनी भूसे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिका, उद्धव ठाकरेंनी त्यांची उपनेतेपदी केलेली निवड आणि त्यातून होणारे एकमेकांव करण्यात येणा-या राजकीय आरोपांमुळे मालेगावात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

गेल्या आठवड्यात उध्दव ठाकरेंची मालेगावात सभा असतानाच फसवणूक झालेल्या लोकांनी धरणे आंदोलन सुरु केले. तसेच, सटाणा पोलिस ठाण्यात हिरे व त्यांच्या काही सहका-यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दुस-याच दिवशी पुन्हा त्या लोकांनी महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांना आरोपींवर योग्य ती कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT