Ahmednagar Agricultural Produce Market Committee
Ahmednagar Agricultural Produce Market Committee  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bazar Samiti Results: नगर बाजार समितीत शिवाजी कर्डिलेंनी गड राखला; 18 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरवात झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या ताब्यात आली आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये 18 जागांपैकी 18 जागांवर कर्डिले गटाचा दणदणीत विजय झाला आहे. तर उर्वरित सहा जागांवर मतमोजणी सुरू असून थोड्याच वेळात तेथेही कोण बाजी मारतं? ते समोर येणार आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता आली आहे. नगर बाजार समितीवरील तर कर्डिले यांच्या गटाची सत्ता उलथून टाकण्यासाठी महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली होती.

मात्र, शशिकांत गाडे यांच्या गटाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे नगर बाजार समितीवर कर्डिले गटाचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT