Aaditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackeray News : उत्तर महाराष्ट्र, खान्देश दौऱ्यात युवराज फुंकणार लोकसभेचे बिगुल

Sampat Devgire

Nashik Shivsena Politics :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'राजकारण जोरात' सुरू आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. त्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे आदित्य ठाकरेंचा दौरा. दोन दिवसांनंतर आदित्य ठाकरे नाशिक आणि जळगावचा दौरा करणार आहेत.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) येत्या बुधवारी (14 फेब्रुवारी) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आहे. यावेळी ते थेट निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

राज्यात भाजपकडून (BJP) विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप नेहमी होतो. यामध्ये विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न असला तरी, ठाकरे गट याकडे दुर्लक्ष करत थेट जनतेमध्ये जाऊन संवाद सत्रांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार आदित्य ठाकरे 14 आणि 15 फेब्रुवारीला नाशिक (Nashik) आणि जळगावचा (Jalgaon) दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा नेहमीपेक्षा वेगळा असून यावेळी ते रेल्वेने प्रवास करतील. 14 तारखेला ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक येथे संवाद मिळावे होतील. या मेळाव्यांमध्ये शिवसैनिक आणि मतदारांची थेट भेट घेऊन संवादावर त्यांचा भर असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छूक उमेदवार जनसंपर्कावर भर देत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नाशिकची जागा कोणाला, याचा गोंधळ कायम आहे. तर महाविकास आघाडीत मात्र नाशिकची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मिळणार, असे संकेत यापूर्वीच देण्यात आले आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. मात्र मतदारसंघात पक्षाकडून जनसंपर्कावर भर देण्यात येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षात देखील फूट पडल्याने मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांविषयी कमालीची सहानुभूती दिसून येते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दौरा होत आहे. या दौऱ्यातून ते थेट लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवतील.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT