Abhijeet Gosavi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये `आप`चा जल्लोष, पंजाबच्या विजयाने नवीन राजकीय पर्याय!

नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत विजय साजरा केला.

Sampat Devgire

नाशिक : पंजाबमध्ये (Punjab) गेल्या पाच वर्षात काँग्रेस (Congress) पक्षाने काय काम केले, हे त्यांना सांगता आले नाही. त्याचा परिणाम म्हणजे जनतेने आम आदमी पक्षाला (AAP) मोठा विजय दिला. अरविंद केजरीवाल या निमित्ताने एक राष्ट्रीय पर्याय म्हणून पुढे आले आहेत, अशी प्रतिक्रीया `आप`चे राज्य प्रवक्ते अभिजीत गोसावी (Abhijit Gosavi) यांनी व्यक्त केली.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यात पंजाबमध्ये `आप`ने मुसंडी मारली आहे. जवळपास नव्वद जागांवर ते आघाडीवर आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पगडी परिधान करून दुचाकीवरून मिरवणूक काढली. याबाबत राज्य प्रवक्ते गोसावी यांनी आगामी काळात जनतेला नवीन राजकीय पर्याय मिळाल्याचा दावा केला.

ते म्हणाले, आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकुच करीत आहे. आमच्या पक्षाला किमान ९० जागा मिळतील हा आमचा विश्वास आहे. या निवडणूक निकालाद्वारे एक संदेश सबंध देशात स्पष्टपणे गेला आहे. देशाला एक नवीन राजकीय व राष्ट्रीय पर्याय मिळाला आहे. जो की वास्तववादी राजकीय पर्याय आहे. केवळ निवडणूक आयोगाच्या नोंदणीपुरता राष्ट्रीय पर्याय नाही. भारताचे नवीन पंतप्रधान म्हणून अरविंद केजरीवाल पुढे आले आहेत. संपूर्ण देश त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे.

श्री. गोसावी म्हणाले, येणाऱ्या काळात भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री होतील. तर आगामी काळात संपूर्ण देश केजरीवाल यांना भारताचे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने दिल्ली मॅाडेल घेऊन प्रचार केला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज आणि पाणी यावर भर दिला. दुसरीकडे काँग्रेस दहशतवादी म्हणून अरविंद केजरीवाल यांना छळत होते. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस, नरेंद्र मोदी व राहुल गांधी हे एका भाषेत बोलत होते. अरविंद केजरीवाल हे आतंकवादी आहे. राहुल गांधी यांना गेल्या पाच वर्षात काय काम केले हे सांगता येत नव्हते. भाजपला तर पंजाबमध्ये त्यांना ग्राऊंडच नव्हते. अरविंद केजरीवाल मात्र ठामपणे शिक्षण, आरोग्य, रोजगार या सामान्यांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे सांगून ते भगवंत मान सोबत प्रचारात किल्ला लढवत होते. जनतेने त्यांना स्विकारले. त्यामुळे आम आदमी पार्टी आता पंजाबमध्ये सरकार बनवणार आहे.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT