Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई सरकारवरच उलटली!

Sampat Devgire

नाशिक : आमच्याविरुद्ध (Chhagan Bhujbal ) देखील चुकीच्या पद्धतीने यापूर्वी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. ही बाब अतिशय चुकीची आहे. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर केलेली कारवाई शेवटी सरकारवरच उलटली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. (NCP leader Chhagan Bhujbal criticise on State Government for wrong police action)

श्री. भुजबळ यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे शासकीय यंत्रणाचा वापर व्यक्तींच्या बदनामीसाठी होऊ लागला तर गंभीर स्थिती निर्माण होईल. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे हा विनयभंग होत असेल तर लोकलमध्ये हजारो महिला पुरुष प्रवास करतात यामध्ये अनेकांना रोज धक्का लागतो अशावेळी तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील. कुठल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, देशातील लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी न्याय व्यवस्थेची भूमिका अतिशय महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेकडून येणाऱ्या चांगल्या निणर्यामुळे देशातील नागरिकांचा न्यायालयांवर विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे आजही देशातील नागरिक न्यायाची अपेक्षा ही न्यायालयाकडून करतात असेही ते म्हणाले.

ती कारवाई सरकारवर उलटली

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविषयक प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. भुजबळ यांनी श्री. आव्हाड यांच्यावर केलेली कारवाई शेवटी सरकारवर उलटली अशी टीका केली. कुठल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर होऊ नये, अशी अपेक्षा असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, की देशातील लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी न्याय व्यवस्थेची भूमिका महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेकडून येणाऱ्या चांगल्या निणर्यामुळे देशातील नागरिकांचा न्यायालयांवर विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे आजही देशातील नागरिक न्यायाची अपेक्षा ही न्यायालयाकडून करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT