Nashik water issue
Nashik water issue  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

"आदित्य ठाकरे पोहचले नाशिकच्या शेंद्रीपाड्यावर; केली मोठी घोषणा"

सरकारनामा ब्युरो

नाशिक : राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज नाशिक जिल्ह्यातील खरशेत शेंद्रीपाडा येथे भेट दिली. मागच्या काही दिवसांपूर्वी या आदिवासी पाड्यावरील महिलांची पाणी नेताना होणारी करसत सोशल मिडीयाच्या माध्यमातून देशासमोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून तात्काळ दखल घेत याठिकाणी लोखंडी पुल बसवून दिला होता. आज नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी या पुलाची पाहणी केली.

यावेळी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गावातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि क्षेत्रातील अनेक समस्यांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या हस्ते यावेळी शेंद्रीपाडा इथे इतर विकास कामांचेही उद्घाटन करण्यात आले. यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या स्थानिक विभाग निधीतून सोलर ड्यूल वॉटर पंपिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच गावातील पेयजल योजनेचाही त्यांनी आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत कृषीमंत्री दादाजी भुसे, (Dadaji Bhuse) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि शिवसेनेचे इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी १३ गावांसाठी एक महत्वाची घोषणा देखील केली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सोशल मीडियावर नाशिकमधील या आदिवासी पाड्यावरील महिलांना पाणी नेताना होणाऱ्या कसरतीचे फोटो व्हायल झाले होते. या फोटोची दखल घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने आता तेथे एक लोखंडी पुल बनवला आहे. मात्र ही केवळ अर्धेच काम झाले आहे. पुढच्या ३ महिन्यात गावातील प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, " खरे तर आम्ही तुमची माफी मागितली पाहिजे, की आतापर्यंत या गोष्टी झाल्या नाहीत. लगतच्या शहरात सुविधा होतात. विकास होतो. त्यात शहरीकरण वाढत असताना अजूनही काही भाग असा आहे. त्याची माहिती मिळाल्यावर मी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगितलं की, पुढच्या तीन महिन्यात या भागातील सर्व १३ पाड्यांवर घरोघरी पाणी देणार आहेत. तुम्ही अनवाणी चालत असतात. दगड गोटे असतात. मी महाराष्ट्रात एक तरूण मंत्री म्हणून काम करत असताना, माध्यमांनी अशा व्यथा आमच्याकडे पोहोचवाव्या, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT