Aditya Thackrey
Aditya Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackrey; ठाकरेंचा दावा, `खोके` सरकार लवकरच कोसळणार?

Sampat Devgire

सिन्नर : (Nashik) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा काळ हा सुवर्णकाळ होता. कोरोना (Covid19) काळातही राज्यात (Maharashtra) अनेक विकासकामे झाली. मात्र, खोके घेऊन स्थापन झालेल्या सरकारचे (Eknath Shinde) लक्ष केवळ पैसा हाच आहे. हे सरकार अल्प दिवसांचे आहे. काही दिवसांतच हे ते कोसळणार असून विधानसभेच्या निवडणूका लागतील असा दावा शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी केला. (Eknath Shinde Government is short term & will fall)

सिन्नर येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा झाला. यावेळी ते म्हणाले, राज्यात कायदा सुवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अधिकारीही याकडे गांभीर्याने बघत नसून, इच्छितस्थळी बदली करुन घेण्यासाठी सरकारला पैसे देत आहे.

यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या खोके सरकारने पोकळ आश्‍वासनं देत ४ हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहचली नाही. हे सरकार केवळ कंत्राटदार, बिल्डर, व्यावसायिकांचे खिसे भरण्यात समाधान मानत असून जनभावनेचा सरकारकडून खेळ सुरु आहे.

माझ्या मागे ‘महाशक्ती’ नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे गद्दार माझ्या अंगावर येत आहेत. पण, जनता मला सांभाळत असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी व्यासपिठावरुन थेट जनतेत येत भाषण केले. येणाऱ्या सर्वच निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तालुक्यात सर्वच निवडणूकांत भगवा फडकेल असा विश्‍वास श्री. दानवे यांनी व्यक्त केला.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, छोटू ताजनपुरे, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, शहरप्रमुख गौरव घरटे, शैलेश नाईक, पिराजी पवार, विलास सांगळे, संजय सानप, अरविंद सांगळे, गणेश आव्हाड, मंगेश सांगळे, आबासाहेब खैरनार, रामनाथ धनगर, किरण घुगे, कैलास आव्हाड, महेंद्र सांगळे, विनायक आव्हाड, शांताराम सांगळे, संजय आव्हाड व्यासपीठावर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT