Satish Kulkarni News, Nashik Latest News in Marathi
Satish Kulkarni News, Nashik Latest News in Marathi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मी भाजपचा महापौर, म्हणून आकसाने निवासस्थान सोडायला लावले!

Sampat Devgire

नाशिक : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचीही ७ मार्चलाच मुदत संपली, मात्र त्यांना मात्र प्रशासनाने १० मेपर्यंत महापौर निवासस्थानात (Mayor House) राहू देण्याची परवानगी दिली. मात्र, त्याचवेळी मला मात्र त्यापूर्वीच महापौर निवासस्थान सोडण्यासाठी आग्रह धरला गेला. मी भाजपचा (BJP) महापौर असल्यामुळेच आकसातूनच महापौर निवासस्थान रिकामे करून घेण्यासाठी नाशिकला कारवाई झाली, असा आरोप माजी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी केला. (Nashik Latest News in Marathi)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर व नाशिकचे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची एकावेळी म्हणजे ७ मार्चला मुदत संपली. मात्र मुंबईत श्रीमती पेडणेकर या शिवसेनेच्या महापौर असल्यामुळे त्यांना राणी बागेतील निवासस्थान सोडण्यासाठी प्रशासनाने १० मेपर्यंत सूट दिली. तशी सूट नाशिकच्या महापौर निवासस्थानाबाबत देता येणे शक्य होते. पण केवळ भाजपचा महापौर आणि त्या शिवसेनेच्या महापौर असल्यामुळेच प्रशासनाने हा दुजाभाव केल्याचा श्री. कुलकर्णी यांचा आरोप आहे.

मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी महापौर निवासस्थानात तेथील माजी महापौरांना राहू देण्याची विनंती मान्य केली मग नाशिकला हा न्याय का लावला गेला नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्यामुळे मुंबईच्या माजी महापौरांना एक न्याय व नाशिकला भाजपची सत्ता असल्याने इथल्या महापौरांना वेगळा अन्याय केला गेला. ही आकसाचीच कारवाई होती, असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT