Rekha Thakur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : नामांतराचा मुद्दा तापला; 'वंचित'च्या रेखाताई ठाकूर म्हणाल्या, 'भावनिक मुद्यांवर...'

State president of Vanchit Rekha Thakur conducted interviews with the aspirants of Ahmednagar district for the assembly elections : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अहमदनगरच्या सरकारी विश्रामगृहावर प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी घेतल्या.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : या समाजाच्या मतांवर सत्ता उपभोगून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असताना, त्या समाजातून नेतृत्व देण्याचे काम वंचित पक्षाच्या माध्यमातून होत आहे. यासाठी राज्यभर मुलाखतीद्वारे चाचपणी सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली.

अहमदनगर शहराच्या नामांतरावर बोलताना सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून भावनिक मुद्दयांवर सत्ताधारी राजकारण करत असल्याचा घणाघातही ठाकूर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अहमदनगर शहरातील सरकारी विश्रामगृह इथं झालेल्या पक्षाची बैठक आणि मुलाखतीनंतर रेखा ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, उत्कर्षा रूपवते, दक्षिण-उत्तर प्रभारी डॉ. सुरेश शेळके, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, शहराध्यक्ष हनीफ शेख, जिल्हा संपर्कप्रमुख योगेश साठे उपस्थित होते.

रेखा ठाकूर म्हणाल्या, "ज्यांच्या मतांवर सत्ता मिळवली, त्याच समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचे काम प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधकांनी केले. प्रत्येक समूहाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. प्रस्थापितांना पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहे". आरक्षण, शेतकरी (Farmer) प्रश्न आणि शेतीमालाला हमीभावासाठी कायदा हे प्रमुख मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असेही रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले.

राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी प्रस्थापितांनी आणि विरोधकांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली. वंचित घटकातील समाजबांधवांचा त्यांनी कधीही विचार केलेला नाही. वंचित बहुजन आघाडी विस्थापितांचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. राजकीय घराण्यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी व दुर्लक्षित समूहाला प्रतिनिधित्व देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT