Nawab Maliq Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्या मालमत्तांबाबत `ईडी`ची नाशिकला झाडाझडती?

शहरातील औद्योगिक भंगार बाजार असलेला अंबड लिंकरोड तपास यंत्रणेच्या रडारवर

Sampat Devgire

सतीश निकुंभ
नाशिक : मंत्री नवाब मलिक (Nawab Maliq) यांच्या मालमत्तेबाबत ईडी (ED) चे पथक नाशिकच्या भंगार बाजारासह औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या कंपन्यांचे स्क्रॅप व्यवहाराची माहिती मिळविण्यासाठी नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले आहेत. यामुळे सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केट मधील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

सातपूर अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार व्यवसाय विविध कारणांनी चर्चेत आहेत. दोन वेळा उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होऊन ही हा भंगार मार्केट आज तगायत जैसे थे आहे. त्याच कारण ही तसेच आहे. या भंगार मार्केटमध्ये असलेली मक्तेदारी बहुतेक उत्तर भारतीय नेत्यांशी संबंधित आहे. खास करून अबू आजमी, कृपा शंकरसिंग, नवाब मलिकसह किमान दोन डझन पेक्षा जास्त बडे नेत्यांशी संबंधित नातेवाईकांचे आहेत, अशी शासन यंत्रणेतील अधिकारी खासगीत सांगतात.

भंगार व्यवसायातून मिळणारा आर्थिक लाभामुळे स्थानिक प्रशासन ही कारवाई करताना हाताच राखून कारवाई करते, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. यापूर्वी काँगेस, राष्ट्रवादी, भाजपसह अन्य पक्षांचा प्रचारात या लिंक रोडचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. दरम्यान, सद्या गाजत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ‘ईडी’ चा ससेमिरा सातपूर- अंबड लिंक रोड पुन्हा चर्चेत आला आहे. मलिक व त्यांच्या मुलांच्या व अन्य नातेवाइकांच्या नावाने असलेल्या संपतीबाबत इडीने चौकशी सुरू केली आहे.

मुंबई, कोकण, औरंगाबाद तसेच नाशिकमधील संपतीबाबत चौकशी करण्यासाठी एक पथक गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये आले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. यात औद्योगिक क्षेत्रातील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांतील भंगार व्यवहार तसेच सातपूर अंबड लिंक रोडवरील काही व्यावसायिकांची माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे मंत्री मलिक यांच्याशी संबंधित भंगार व्यावसायीक तसेच जिल्हातील मोठ्या कंपन्यांतील वरिष्ठ व्यवस्थापकही रडारवर आले आहेत.

शासकीय विभागांना पत्र
मंत्री मलिक यांच्या मालमत्तांबाबत ‘ईडी’ ला अधिक माहिती हवी आहे. त्यासाठी त्यांनी त्या- त्या जिल्हा उपनिबंधकांसह इतर शासकीय यंत्रणेला पत्र पाठवले आहे. मागील हप्त्यात सिन्नर येथील एका बंद असलेल्या कंपनीत अचानक आग लागल्याची घटना समोर आली होती. यात मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्यासोबत काही कागदपत्रे ही जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे ही कंपनी शासन यंत्रणेला बाहेरून बंद असल्याचे दाखवले जात असताना अंतर्गत मात्र भंगार व्यवसायाच्या नावाने अनेक गंभीर गोष्टी घडत असल्याची चर्चा आहे. ईडी ला सुगावा लागू नये म्हणून या बंद कंपनीला आग लावून महत्त्वाचे कागदपत्रे जाळ्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करीत आहे. या बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसिबी) व औद्योगिक सुरक्षा या विभागातील अधिकारीही दोन दिवसांपासून संबंधित बंद कंपनीतील घटनेचा तपासात गर्क आह
----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT