BJP MLA Seema hiray & Maratha protesters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Resrvation News : भाजप आमदार सीमा हिरे यांच्या राजीनाम्याची मागणी!

Sampat Devgire

Nashik Maratah Reservation News : शहरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची तीव्रता आज अधिकच वाढली. आंदोलकांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचा निषेध करीत त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या वेळी तेथील कर्मचारी निघून गेले. (Maratha protester angry on BJP`s ignorance towards protest in Nashik)

नाशिक (Nashik) शहरात मराठा आरक्षणाची (Maratha reservation) धग वाढत आहे. काल शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना जाब विचारल्यानंतर आज सिडको भागात भाजप (BJP) आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्या विरोधात जोरदार आंदोलन झाले.

शहरातील चारही आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. यामध्ये भाजपचे तीन आमदार आहे. त्यातील देवयानी फरांदे उघडपणे ओबीसी वर्गाच्या बाजूने भूमिका घेत असतात. आमदार हिरे आणि राहुल ढिकले यांनी याबाबत फारसे काहीही केलेले नाही, असा आंदोलकांचा आरोप होता. त्यामुळे आज सिडकोतील कार्यकर्ते आमदार हिरे यांच्या कार्यालयावर गेले. तिथे त्यांनी आंदाेलन केले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भजप आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला टाळे ठोकले. या वेळी त्यांनी तीव्र आंदोलन करीत घोषणाबाजी केली. आमदार हिरे यांनी आमदार पदाचा राजीनाना देण्याची मागणी केली.या वेळी या कार्यालयातील कर्मचारी निघून गेले.

या वेळी बाळासाहेब गीते, संजय भामरे, आशिष हिरे, सुनील जगताप, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, प्रीतम भामरे, अमित खांडे, श्याम पाटील, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर, सागर पाटील, अक्षय पाटील आदी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT