Shivsena UBT Politics
Shivsena UBT Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena UBT Politics : कांदा उत्पादकांचा भाजप विरोधात संताप, बाजार समिती बंद पाडली

Sampat Devgire

Shiva Surase Politics : केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारने पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. निर्यात शुल्क कायम ठेवल्याने कांदा उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने अन्न आणि पुरवठा विभागा मार्फत कर्नाटकातील कांद्यावरील निर्यात शुल्क संपवले आहे. त्यामुळे कर्नाटकातील कांदा निर्यातीला चालना मिळेल.

केंद्र शासनाच्या या निर्णया विरोधात लासलगाव येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव समितीचे कामकाज शिवसेनेचे नेतृत्वाखाली आंदोलन करून शेतकऱ्यांनी बंद पाडले.

केंद्र शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक करत आहे. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे. गुजरातचे लाड आणि महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांचे हाल अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला गुजरात (Gujrat) आणि आता कर्नाटकातील कांद्याचे निर्यात शुल्क समाप्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादन होते कांदा निर्यात देखील महाराष्ट्रातून सर्वाधिक होते. गेल्या तीन महिन्यात कांदा निर्यात होऊ शकलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचे दर कोसळले त्यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्याचा निषेध म्हणून आंदोलन केल्याचे शिवसेनेचे नेते शिवा सुरासे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज सकाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीच्या (Bajar Samiti) आवारात घोषणा दिल्या. भाजपचा निषेध केला. यावेळी श्री सुरासे यांसह बाळासाहेब जगताप, प्रमोद पाटील, संतोष पानगव्हाणे, भैय्या भंडारी, केशव गारे, सोमनाथ गारे यांचा मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT