Dada Bhuse, Agreeculture Minister
Dada Bhuse, Agreeculture Minister Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कृषिमंत्री दादा भुसे म्हणतात, तरुणांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे!

Sampat Devgire

मालेगाव : उद्योग-व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना लघुउद्योगात मोठा वाव आहे. लघुउद्योगातून स्वतःबरोबरच इतर कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍नही आपण सोडवू शकतो. मालेगाव व तालुक्यातील युवकांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

येथील राजस एंटरप्राइजेस ॲल्युमिनिअम ॲनोडायझिंग औद्योगिक युनिटचा प्रारंभ कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. श्री. भुसे म्हणाले, की फॅब्रिकेशन क्षेत्रातील पहिले औद्योगिक युनिट मालेगावात सुरू होत असल्याचा आनंद आहे. मालेगावसह कसमादेत हा पहिलाच उद्योग असल्याने या भागातील लहान व्यावसायिक व नागरिकांची सोय झाली आहे. मालेगाव व परिसरात अनेक उद्योग-व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. युवकांनी याचा अभ्यास करून या क्षेत्रात करिअर घडवावे.

राजस एंटरप्राइजेसचे संचालक रोहित पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, ज्येष्ठ नेते मनोहर बच्छाव, मामको बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रवी शेलार, प्रोफेशनल बिल्डिंग असोसिएशनचे मधुकर पाटील, सामान्य रुग्णालयाचे डॉ. हितेश महाले, डॉ. पुष्कर इंगळे उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT