Abdul Sattar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Abdul sattar News : अब्दुल सत्तार अधिकाऱ्यावर भडकले, शेतकऱ्यांशी नीट वागा!

मी कृषी विभागाच्या पाठीशी मात्र त्यांनी शेतकऱ्यांशी नीट वागावे, असा दम भऱला.

Sampat Devgire

Abdul sattar News : कृषी अधिकाऱ्याने एका अपंग शेतकऱ्याला दुरूत्तरे केली. कोणालाही सांगा पंचनामे होणार नाही, असे शेतकऱ्याला सांगितल्याची माहिती मिळाल्याने कृषी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेचस भडकले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना एक तासात याबाबत माहिती घेऊन मला सांगा. शेतकऱ्यांशी नीट वागा अन्यथा कारवाई होईल असे त्यांनी पत्रकारांसमोरच सांगतिले. (Abdul Sattar warns agriculture department officer for missbehavior with farmer)

कृषी (Agriculture) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या उपस्थितीत येथील विभागीय महसूल (Revenue) कार्यालयात कृषी आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी शेतीचे नुकसान, पंचनामे आदींबाबत विविध सुचना केल्या. शेतकऱ्यांच्या (Farmers) तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

श्री. सत्तार म्हणाले, मी सकाळी सातला दौरा सुरू करतो. मी म्हणजे लोकल रेल्वेसारखे हात दाखवा गाडी थांबवा असे काम करतो. यावेळी विजय दौंड या अपंग शेतकऱ्याला अधिकाऱ्याने `कोणालाही सांगा पंचनामा होणार नाही` असे दुरूत्तर केल्याची माहिती मिळाली. त्यावर सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी याबाबत एक तासाच्या आत याविषयी माहिती घेऊन मला द्यावी. शेतकऱ्यांबाबत कोणताही अपमान सहन केला जाणार नाही. आम्ही प्रशासनाच्या पाठीशी आहोत, मात्र तुम्ही देखील शेतकऱ्यांशी नीट वागा, असे सांगितले.

ते म्हणाले, अवेळी पावसाने नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहिला असे होता कामा नये. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी आज त्यांनी बैठक घेतली. जलसंपदा आणि जल संधारण योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. दुर्गम भागात बियाणे, खंते पुरवण्याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले, बोगस बियाणे, खते आपल्या राज्यात येणार नाही यासाठी गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना जवाबदारी दिली आहे. शेतकऱ्यांना खतांचा, बियाणांचा साठा कमी पडणार नाहीत यासाठी प्रशासन प्रयत्न राहील. काही ठिकाणी पावसाच्या पुर्वसुचना देणाऱ्या यंत्रणा बसवायच्या आहेत. त्यासाठी दहा हजार नवे यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री. सत्तार यांनी आमदार सुरेश धस यांनी कृषी अधिकाऱ्याला धमकी दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. मी सर्व लोकप्रतिनिधींना हात जोडून विनंती करतो, कोणीही अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करू नये. तसे झाल्यास मी कृषी विभागाच्या पाठीशी उभे राहील. आणदार धस यांच्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वाद झाल्यास त्याचा कामावर परिणाम होतो. तसं होत असेल, अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने धमक्या, मारहाण केली जात असेल तर मी माझ्या विभागाच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT