Eknath Shinde News, Dada Bhuse News, Nashik Latets Marathi News
Eknath Shinde News, Dada Bhuse News, Nashik Latets Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : अखेर कृषीमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे गटात दाखल!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचा (Shivsena) बंडाचा झेंडा आणि आवाज दोन्हीही दिवसागणीक बुलंद होताना दिसतो. कालपर्यंत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी एकंदर राजकीय हालचालींचा आढावा घेतला. त्यानंतर ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Shivsena Minister Dada Bhuse leave Uddhav Thakrey)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक आवाहन केले होते. त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. त्यांच्या आवाहनानंतर देखील काही आमदार, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे. आता काही खासदार देखील शिंदे यांच्या सुरात सुर मिसळताना दिसत आहेत. (Dada Bhuse News in Marathi)

काल श्री. ठाकरे यांच्या सोबत असलेले आमदार आज पुन्हा पसार झाले. मंत्री आदित्य ठाकरे काही मंत्र्यांना स्वतःच्या गाडीत वर्षा वरून हॉटेल सेंट रेजिसला घेऊन गेले होते. त्यात गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर होते. हे सर्व एकनाथ शिंदे गटाला मिळाले. त्या पाठोपाठ सदा सरवणकर, संतोष बांगर हे देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत. (Eknath Shinde news in Marathi)

त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षातील आमदारांना माहिती नाही का? असा सवाल उपस्थित होतो. त्यात शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खदखद व्यक्त केली होती.

काल रात्री पर्यंत मुंबईत असणारे कृषीमंत्री दादा भुसे आज नेमके कुठे? आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीपासून दादा भुसे कोणाच्याही संपर्कात नाहीत. भुसे यांचा फोन सुरू असला, तरी ते कुणाचाही फोन रिसिव्ह करत नसल्याने भुसे देखील शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान आज सकाळी `सरकारनामा`च्या प्रतिनिधीने श्री. भुसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रय्तन केला. यावेळी त्यांच्याशी संपर्क झाला नाही. मात्र त्यांच्या समवेत असलेले शिवसेनेचे मालेगाव शहरातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क झाला. त्यांनी श्री. भुसे अद्याप मुंबईत आहेत. मात्र सगळेच आमदार शिंदे गटाकडे जात आहेत, आपण काय करावे? असा सुचक प्रश्न त्यांनी केला. दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT