AIMIM local election strategy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AIMIM local election strategy : इम्तियाज जलील यांच्याबरोबर परवेज अशरफींची खलबतं; 'AIMIM' खातं उघडण्याची 'मन्नत' पूर्ण करणार

Ahilyanagar AIMIM Parvez Ashrafi Meets Imtiaz Jaleel to Discuss Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी भेट घेतली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar AIMIM : लोकसभा निवडणुकीत 'AIMIM' अहिल्यानगर जिल्ह्यात धमाल उडवून दिली होती. निवडणुकीत नसणार-नसणार म्हणता, रात्रीतून चक्र फिरली अन् 'AIMIM'ने अहिल्यानगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल केला. पण जसा दाखल केला, तसा तो माघारी पण घेतला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर सर्वांची दाणादाण उडाली.

त्यात 'AIMIM' देखील टिकली नाही. आता मात्र, 'AIMIM'ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कंबर कसली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही परिस्थिती खातं उघडायचं, असं चंग बांधला असून, यासाठी 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष डाॅ. परवेज अशरफी यांनी भेट घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं 'खलबतं' केली.

'AIMIM'चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. परवेज अशरफी यांनी छत्रपती संभाजीनगर इथं प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीचा आढावा मांडला. इच्छुकांची कमी नाही, पण संघटनेतून तयारी झाल्यास विजय दूर नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खातं उघडल्याशिवाय राहत नाही. महापालिका निवडणुकीत महायुती आणि 'मविआ'च्या बेरजेच्या राजकारणात 'AIMIM' शंभर टक्के खातं उघडेल, असे अशरफी यांनी म्हटले.

मुस्लिमांसह बहुजन भागात आणि अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या हिंदुत्वाच्या (Hindu) राजकीय प्रयोगावर सुशिक्षित आणि बेरोजगार नाराजींना एकत्र करून निवडणुकाला समोरे जाण्याची तयारी करा, अशा सूचना इम्तियाज जलील यांनी दिल्या. या सूचनेपूर्वी 'AIMIM'ने लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रयोगाची चर्चा सुरू आहे.

'AIMIM'ने लोकसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांना उमदेवारी दिली. एका दिवसात अर्ज प्रक्रिया जशी पूर्ण केली, तशी रात्रीतून उमेदवारी अर्ज माघारी देखील घेण्यात आला. ही नाट्यमय घडामोडीमध्ये 'AIMIM' चर्चेत आली. महायुती आणि मविआकडून 'AIMIM'वर 'बी-टीम'चे आरोप केले. पण यातून 'AIMIM'ने विधानसभेची वातावरण निर्मिती केली. परंतु विधानसभेला 'AIMIM'ने मर्यादीत जागा लढल्या.

पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत 'AIMIM'ने चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिकेत कोणत्याही परिस्थिती खातं उघडण्याची तयारी 'AIMIM' केली आहे. त्यासाठी इच्छुक देखील संपर्कात असल्याचा दावा डाॅ.परवेज अशरफी यांनी दावा केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच संघटनेचा अहिल्यानगर शहरात मेळावा घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय इम्तियाज जलील या मेळाव्याला उपस्थित राहण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची सभा किंवा रॅली घेण्याचे नियोजन आखले जात आहे. पण यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून माघार नाही. खातं खोलण्याची तयारी असल्याचे डाॅ. परवेज अशरफी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT