BJP Mahayuti government farmers issue : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर भाजप महायुती सरकार असंवेदनशील असल्याची टिका केली.
जप महायुती सरकारच्या गंभीरपणावर निशाणा साधताना थोरातांनी, धाराशिव जिल्ह्यातील कलेक्टर नाचगाणी करतो, हे सरकार किती गंभीर आहे याचे उदाहरण आहे, असा टोला लगावाला. ओला दुष्काळ तातडीने जाहीर करून मदत द्यावी, अन्यथा शेतकरी संताप व्यक्त करतील, असा इशाराही थोरातांनी दिला.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव अन् पाथर्डी तालुक्यांमधील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. अहिल्यानगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत थोरातांनी भाजप महायुती सरकारच्या असंवेदनशीलपणावर निशाणा साधला.
कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना थोरातांनी, निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाते. मात्र नंतर त्यावर टाळाटाळ केली जाते. आम्ही सत्तेत असताना एक लाखापर्यंतची कर्जमाफी दिली होती. त्यामुळे आजचे सरकार घोषणा करीत असेल, तर त्यांनी ती अमलात आणून शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
'राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
'केंद्र व राज्य सरकारने मिळून पंजाबमधील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये, मृत जनावरासाठी 40 हजार रुपये, तर घराची पडझड झाल्यास 50 हजार रुपयांची मदत दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मदत द्यावी. सरकारने सरसकट पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत वितरित केली, तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल,' असे थोरात यांनी म्हटले. जीएसटी परताव्यावर, महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी मिळतो. मात्र परतावा अपुरा मिळतो, असेही थोरात यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.