Ahilyanagar BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar BJP : 'स्थानिक' निवडणुकांमध्ये ताकद दाखणार; भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी एकत्रित प्रेस, मित्रपक्षांसह विरोधकांना सूचक इशारा

Ahilyanagar BJP Leaders Share Local Body Election Strategy and Preparations : अहिल्यानगर भाजप संघटनेतील तिन्ही जिल्हाध्यक्षांनी एकत्रित प्रेस घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारी सुरुवात केल्याचं स्पष्ट केले.

Pradeep Pendhare

BJP election strategy Ahilyanagar : नेहमीच निवडणुकांच्या 'मूड'मध्ये असलेली भाजप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू केल्याचे सूचक संकेत तिन्ही जिल्हाध्यक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन दिले.

भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांची, अशी एकत्रित पत्रकार परिषद घेण्याचा अलीकडच्या काळातील दुर्मिळ योग महायुतीमधील मित्रपक्षांना आणि विरोधकांना राजकीय धडकी भरवणारा ठरला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या लगबग संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी एकत्र येत घेतलेली पत्रकार परिषद चर्चेची ठरली. यातून विरोधकांना संघटनेच्या पातळीवर किती काम करावं लागेल, याचे सूचक संकेत देखील मिळाले.

भाजपचे (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची ही पत्रकार परिषद एकत्रित झाली. यात तिघांनी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहोत. महायुतीचा निर्णय पक्षपातळीवरून होईल. परंतु सद्यस्थितीत या निवडणुकांसाठी भाजपला पोषक वातावरण आहे, असे तिघांनी सांगितले.

महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदांवर भाजपची सत्ता येणार आहे, असा दावा आज भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला आहे या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने लवकरच भाजपचा भव्य मेळावा जिल्ह्यात घेणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.

विकसित भारत पाहतोय

देशातील मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत झालेला विकास व प्रगतीची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरू केल्याचा दावा केला.

तीन मजली रस्ता होणार

देश व महाराष्ट्र राज्य, जसे प्रगती करत आहे, त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातही सर्वांगीण विकासकामे होत आहेत. अहिल्यानगरमध्ये आता सर्व महामार्गांची कामे मार्गी लागत असून, लवकरच राज्यातील पहिला पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा तीन माजली रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे नितीन दिनकर यांनी सांगितले.

भाजपमधील गटतटावर बोलण्यास नकार

अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात भाजपची घोडदौड सुरू आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती प्रा. राम शिंदे तसेच भाजपच्या सर्व आमदारांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार आहोत. महापालिका असो की जिल्हा परिषद, भाजपची सत्ता कशी येईल, असाच आमचा प्रयत्न असल्याचे तिन्ही जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले. दरम्यान, पक्षातील दुफळी, गटतट सारख्या मुद्द्यांवर बोलण्यास तिन्ही जिल्हाध्यक्षांनी नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT