Nilesh Lanke vs Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke vs Radhakrishna Vikhe : 'भाजप मंत्र्यांनं शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला'; पवारसाहेबांचा शिलेदार म्हणतो, 'आता हे मंत्रिमंडळात नाहीच पाहिजे'

BJP Minister Accused of Taking Farmers’ Money; NCP Leader Demands Removal from Cabinet: शेतकऱ्यांच्या नावावर केलेल्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांचा राजीनामा घेण्याची खासदार नीलेश लंके यांची मागणी.

Pradeep Pendhare

Radhakrishna Vikhe Loan Case : महायुती सरकारमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच, शरद पवार यांचा शिलेदार चांगलाच आक्रमक झाला आहे. खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांचा पैसा खाणारा मंत्री मंत्रिमंडळात ठेवू नका, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली आहे.

मंत्री विखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच, खासदार लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मंत्री विखे यांच्या राजीनाम्याची मागणी करून, त्यांना घेरण्याची जोराची तयारी केली आहे.

खासदार नीलेश लंके म्हणाले, "जनतेचे रक्षकच भक्षक झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे, आता जबाबदारी स्वीकारून, त्यांचं मंत्रिपद घातलं पाहिजे.

मंत्री असं काम करत असेल, शेतकऱ्यांचे पैसे खात असेल, तर खऱ्या अर्थानं भक्षक ठरला आहे आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा". भाजपच्या मंडळींना देखील असं सांगणं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, असे मंत्री मंत्रिमंडळात नाही पाहिजे, असेही खासदार लंके यांनी म्हटले.

मंत्री विखे यांनी शेतकऱ्यांचा (Farmer) पैसा बनावट कर्ज करून खाल्ल्याप्रकार सभागृहात देखील उपस्थित करण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला. हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार म्हणजे, करणार असे म्हणत, शेतकऱ्यांना नावावर कर्ज लाटलं आहे. हा सुमारे नऊ कोटी रुपयांचा घोटाळा आहे. मंत्री बेताल वागत असेल, तर ते चुकीचे आहे. त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे पुनरच्चार खासदार लंके यांनी केला.

विखेंविरुद्ध नेमकं काय आहे प्रकरण...

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2004 ते 2010 या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या बेसल डोस कर्जाच्या प्रकरण आहे. तब्बल 8 कोटी 86 लाख रुपयांचे काढलेले हे कर्ज शेतकऱ्यांना न देता, त्याचा गैरवापर केला आणि कर्जमाफीत हे कर्ज माफ करून घेतलं, असं हे प्रकरण आहे.

याप्रकरणी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी अशा 54 जणांविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बँकेतील अधिकाऱ्यांचा सहभाग

बाळासाहेब केरुनाथ विखे (वय 55, रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. 2004 मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला. युनियन बँक व बँक ऑफ इंडिया यांच्या पुणे (Pune) येथील झोनल कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनुक्रमे 3 कोटी 11 लाख व 5 कोटी 74 लाखांचे कर्ज मंजूर करुन घेतले. दोन्ही मिळून तब्बल 8 कोटी 86 लाख रुपयांचे कर्ज काढले होते.

महायुतीच्या मंत्र्यांचे घोटाळे थांबेन

महायुती सरकारमधील एकापाठोपाठ एक मंत्री अडचणी येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार धनंजय मुंडे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री योगेश कदम यांच्याबरोबर आता मंत्री राधाकृष्ण विखे अडचणीत आले आहेत. मंत्री विखे यांच्याविरोधात तर '420'चा गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT