Ahilyanagar District Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेची परिस्थिती असून नसल्यासारखी झाल्याचे दिसते. शिवसेना ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे विधानाने त्याला अधिकच बळ मिळाल्याचे दिसते.
आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारायला हवे होते, असे खासदार वाकचौरे यांचे विधान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेत असलेली अस्वस्थता बरचं काही सांगून जाते.
जिल्हा बँक निवडणुकीचे (DCC Bank) चित्र सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटची दिवशी स्पष्ट होईल. भाजप महायुतीचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या, राहाता आणि संगमनेरमधून कोण उमेदवारी दाखल करतोय, हे सोमवारी समोर येईल.
तत्पूर्वी संगमनेर येथे थोरातांच्या 'अमृतकुटी'वर झालेल्या बैठकीत, दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करायची, असा सूर उमटला. बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) बैठकीचे नेतृत्व केले असले, तरी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. थोरात-विखे पाटील, हे कट्टर विरोधक संगमनेरमध्ये एकत्र आल्याने, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भल्याभल्यांसाठी चर्चेचा विषय ठरला.
थोरात-विखे पाटलांची बैठक झाली असली, तरी बैठकीला अनुपस्थितींची चर्चा देखील रगंली. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार नीलेश लंके, एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे हे बैठकीला नव्हते.
थोरात-विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक सर्वाधिक जिव्हारी कोणाच्या लागली असले, सभापती राम शिंदे, खासदार नीलेश लंके आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या! राम शिंदेंनी उमेदवारी अर्ज घेतला आहेत, खासदार लंकेंनी अर्ज देखील भरला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक घेत, महायुतीत नाराजी असल्याचे संकेत दिले.
दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेना किती नाराज आहे, हे भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलेल्या विधानावरून लक्षात येते. राज्यात महायुतीचे सरकार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारायला हवे होते, असे व्यक्त होत खासदार वाकचौरे यांनी नाराजी व्यक्त केली.
याशिवाय खासदार वाकचौरे यांनी, जिल्ह्यात आमचे दोन आमदार आणि एक खासदार आहे. त्यामुळे आम्हालाही चर्चेत सहभागी करून घ्यायला हवे होते. आमचा याला विरोध नाही. आमचे नेते जसा आदेश देतील, त्याप्रमाणे निर्णय घेऊ, असेही सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.