Ram Shinde cooperative bank election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde cooperative bank election : फोटो वगळला, आता 'हेडमास्तर' जिल्हा बँकेत लक्ष घालणार...

Ahilyanagar District Cooperative Bank Election BJP MLC Chairman Ram Shinde Likely to Focus : चार महिन्यांवर आलेल्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणुकीचे पडसाद वार्षिक सभेत उमटले, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP politics : विधानपरिषदेतील आमदारांचे 'हेडमास्तर', सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचे संकेत दिले आहे.

भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा शुभेच्छा दिल्या. पण अनुमोदनासाठी आपल्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे लागणार असल्याचे सांगून प्रा. राम शिंदे यांनी उत्सुकता वाढवली आहे.

जिल्हा सहकारी बँकेची (Bank) निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी अखेरच्या वार्षिक सभेत निवडणुकीचे पडघम वाजले. सभेत बँकेचे नामांतर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे करण्यात आले. बँकेच्या वार्षिक अहवालातून प्रा. राम शिंदे यांचे छायाचित्र गायब झाला होता. प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनं केली होती. जिल्हा बँकेने घाईघाईने खुलासे, यानंतर वार्षिक अहवाल पुन्हा छापून प्रा. राम शिंदे यांच्या छायाचित्राचा समावेश करून घेतला.

एवढं सगळं पाणी पुलाखालून गेल्यानंतर बँकेच्या वार्षिक सभेला प्रा. राम शिंदे (Ram Shinde) उपस्थित राहणार का? राहिल्यास काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषण करून लगेच निघून गेले. परंतु त्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा शुभेच्छा दिल्या. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बँकेच्या कारभाराचे कौतुक केले. पुढेही तेच अध्यक्ष राहावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी मात्र, बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार टोलेबाजी केली. सभापती प्रा. शिंदे म्हणाले, "बँकेचा अध्यक्ष प्रथमच भाजपचा झाला असला, तरी तो पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून झालेला आहे. यापूर्वी मी कधीच बँकेत लक्ष घातले नव्हते. बँकेच्या राजकारणापासून, कारभारापासून दूर राहिलो. आता विखे पाटील यांनी कर्डिले यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा ठराव केला आहे. त्याला अनुमोद देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे मला बँकेत लक्ष घालावेच लागणार आहे."

शिवाजी कर्डिले असताना, हे झाले कसे?

सभापती प्रा. राम शिंदे यांचे छायाचित्र बँकेच्या अहवालातून वगळले होते. नंतर ते पुन्हा छापून अहवालात घेण्यात आले. यावर प्रा. राम शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'मी पूर्वी विरोधी पक्षाचा पालकमंत्री होतो. त्यामुळे माझे छायाचित्र बँकेच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध केले नव्हते. त्यावेळीही तक्रार केली नाही. आताही माझी तक्रार नाही. परंतु भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले असताना हे घडले कसे, हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून मी प्रथमच बँकेच्या सभेला उपस्थित राहिलो आहे. यापूर्वी लक्ष घातले नाही. आता निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे बँकेत लक्ष द्यावे लागेल,' असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT