BJP Vs NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs NCP : अजितदादांच्या 'NCP'चं भाजपसमोर आव्हान; जगताप-नागवडे आमदार पाचपुतेंना घेरणार

Rahul Jagtap Rajendra Nagawade Join Ajit Pawar NCP BJP Faces Challenge in Shrigonda Ahilyanagar : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा इथले माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांनी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे.

Pradeep Pendhare

BJP challenge in Shrigonda : अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

जगताप-नागवडे यांच्या सहमती एक्सप्रेसमुळे अजितदादांचा राष्ट्रवादी श्रीगोंद्यात मजबूत झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, झालेली ही राजकीय घडामोड भाजप आमदार विक्रम पाचपुते यांना आव्हान देणारी आहे.

माजी आमदार राहुल जगताप व नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या दोघांच्या प्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादीला (NCP) मोठी ताकद मिळणार आहे. दोन्ही नेत्यांच्या या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास मुंबईतील नेत्यांसह त्यांचे समर्थक, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपसमोर महाविकास आघाडीतील पक्षांचे नव्हे, तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचेच तगडे आव्हान उभे ठाकणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) विक्रम पाचपुते यांनी एकतर्फी बाजी मारीत विरोधकांना धूळ चारली होती. विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर जगताप व नागवडे दोघेही बॅकफूटवर गेले. महाविकास आघाडीतील अन्य नेते देखील शांत राहणे पसंत करत आहेत. सगळे विरोधक गलितगात्र झाल्याने गेले काही महिने पाचपुते व भाजपला तालुक्यात 'फ्रीहँड' मिळाल्याची स्थिती होती.

मध्यतंरी काही नेत्यांनी वेगवेगळ्या सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केले. जगताप व नागवडे यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब होत नव्हते. सहकारी कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणी पाहता सत्ताधारी पक्षात प्रवेश करणेही या नेत्यांची अपरिहार्यता होती. शिवाय, पाचपुतेंना रोखण्यासाठी जगताप व नागवडेंना एकत्र येण्यावाचून पर्याय नव्हता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, राज्य सहकारी पणन संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, तालुकाध्यक्ष भगवानराव पाचपुते राष्ट्रवादीची कमान सांभाळत होते. मागील महिन्यात ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता राहुल जगताप व राजेंद्र नागवडे या दोन्ही पाचपुते विरोधक नेत्यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत स्थितीत आली आहे. शिवाय, जगताप व नागवडे हे दोघे एकत्र आल्याने पुन्हा एकदा पाचपुते विरोधकांचा आवाज अधिक बुलंद होणार आहे.

आमदार पाचपुतेंसमोर आव्हान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाचपुते, जगताप व नागवडे, अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. त्यामुळे पुन्हा एकदा पाचपुते विरोधकांची ताकद विभागली जाऊन पाचपुते व भाजपसाठी निवडणुका सोप्या होण्याची स्थिती होती. मात्र, जगताप, नागवडे, दोन्ही शेलार ही सगळी मंडळी राष्ट्रवादीत एकवटल्याने पाचपुते व भाजपसमोर मोठे आव्हान उभं राहीलं आहे. त्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्यासाठी जगताप व नागवडे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

एकदिलानं किती काम करणार?

जगताप, नागवडे, दोन्ही शेलार ही अजितदादांकडे एकटवली असली, कितीहबी सहमती एक्सप्रेस ती प्रत्यक्षात ग्राऊंड किती उतरते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या चौघा नेत्यांचे समर्थक, कार्यकर्ते विखुरलेले आहेत. यांमध्ये देखील राजकीय वाद आहेत. आगामी निवडणुकीत हे राजकीय नेते किती एकदिलाने काम करतील हा संशोधनाचा विषय आहे. विरोधक एकदिलाने समोर आल्यास पाचपुतेंसमोर नक्कीच तगडे आव्हान उभे राहणार आहे. पाचपुते विरोधकांमधील अंतर्गत संघर्षामुळे आतापर्यंत 'फ्रीहँड' मिळालेल्या आमदार विक्रम पाचपुते यांना आता नव्याने राजकीय समीकरणे आखावी लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT