Usha Raut resignation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Usha Raut resignation : राजकीय उलथापालथीनंतर उषा राऊतांविरोधात मतदान झालंच नाही; तरीही रोहित पवार यांच्या एकहाती सत्तेला धक्का

Usha Raut resigned post Ahilyanagar Karjat Nagar Panchayat President cancellation scheduled no confidence motion vote : कर्जत नगरपंचायतीच्या उषा राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने अविश्वास ठरावावर मतदान टळलं.

Pradeep Pendhare

Karjat municipal council : कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी विशेष सभा बोलावली होती. आमदार रोहित पवार यांच्या सत्ताधारी गटातून बाहेर पडलेले राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे दोन, असे सहलीवर गेलेले 13 नगरसेवक कर्जतमध्ये दाखल झाले होते.

मात्र त्या पूर्वीच नगराध्यक्षा उषा राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यामुळे अविश्वास ठरावावर नवीन अध्यादेशानुसार नगरसेवकांना मतदान करण्याची वेळच आली नाही. नगराध्यक्षा उषा राऊत यांचा राजीनामा अंमलात आल्याने विशेष सभेचा इतिवृतांत घेत नगरसेवक सभागृहातून रवाना झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी पाटील यांनी दिली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जत नगरपंचायत परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्यावर भाजपचे (BJP) दोन आणि सत्ताधारी 11, अशा एकूण 13 नगरसेवकांनी राज्य सरकारकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. परंतु महायुती सरकारने नवीन अध्यादेश पारित करत, नगरसेवकांना नगराध्यक्षांना हटविण्याचा अधिकार दिला. त्यानुसार नगरसेवकांनी नवीन अध्यदेशानुसार पुन्हा अविश्वास ठराव दाखल केला.

यानुसार आज विशेष सभा बोलवण्यात आली होती. या विशेष सभेच्या अदल्या रात्री कर्जतमध्ये वेगवाग राजकीय घडामोडी घडल्या. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) मध्यरात्री कर्जतमध्ये दाखल झाल्यानंतर तिथे नगराध्यक्ष असलेल्या उषा राऊत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नगरसेवकांची बैठक झाली. यानंतर उषा राऊत यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे राजीनामा दिला.

उषा राऊत यांनी आपल्या वैयक्तिक आणि घरगुती अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. यानंतर पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्याची आवश्यकता नसल्याने सांगत विशेष सभेचा इतिवृंतात प्रक्रिया पूर्ण करीत 13 नगरसेवकांची हजेरी घेतली. आणि पुन्हा एकदा सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले.

नवीन अध्यादेशामुळे वेळ खाणारी प्रक्रिया थांबली

षा राऊत यांनी अविश्वास ठरावाच्या मतदानापूर्वीच राजीनामा दिल्याने, महायुती सरकारने नव्यानं पारित केलेल्या अध्यादेशानुसार नगरसेवकांना नगराध्यक्षांना हटविण्याची मतदानाची संधी हुकली. एकप्रकारे उषा राऊत यांनी राजीनामा देऊ, गेमच पलटवला. अध्यादेशातील वेळेच्या बंधनामुळे पूर्वी सत्तेच्या गुऱ्हाळसाठी ताणली जाणाऱ्या प्रक्रियेला लगाम बसला, हे मात्र खरं!

मतदान प्रक्रिया टळली

नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा काळ लोटून देखील उषा राऊत यांनी आपला राजीनामा न दिल्याने नाईलाजास्तव आम्हाला त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा लागला. आज अविश्वास ठरावावर मतदान प्रकिया घेण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच नगराध्यक्षा उषा राऊत यांनी राजीनामा दिल्याने आमच्या मतदान प्रक्रियेची वेळ आली नाही. ते आता पदावरून पायउतार झाले आहे. लवकरच जिल्हाधिकारी पुढील पदाधिकारी निवडीबाबत कार्यक्रम जाहीर करतील. त्यानुसार सर्वानुमते पुन्हा एकत्र येत, त्या निवडी खेळीमेळीत पार पडतील, अशी प्रतिक्रिया गटनेते संतोष मेहेत्रे यांनी दिली. मात्र पुढील नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष कोण यावर त्यांनी भाष्य करणे टाळले.

समन्वयाच्या अभावाने आमदार पवारांनी गमावली सत्ता

कर्जत नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 15 जागेवर आमदार रोहित पवारांनी आपल्या विचाराचे नगरसेवक विजयी करीत भाजपच्या ताब्यातून एकहाती सत्ता घेतली. भाजपला या निवडणुकीत अवघ्या दोनच जागेवर विजय मिळवता आला होता. मात्र लोकप्रतिनिधी, नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांत समन्वय न राहिल्याने पदामुळे सत्ताधाऱ्यांतच असंतोष उफाळला. त्याची प्रचिती सोमवारी आमदार रोहित पवारांना आपली सत्ता गमवावी लागली. आगामी काळात कर्जत नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकतो? हे पाहणे आता महत्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT