Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीमधील सत्तांतर नाट्य आता वेगळ्याच टोकावर पोचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने गट नेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकारी यांनी फेटाळली आहे. यामुळे सत्तेतून बाहेर पडलेल्या बंडखोर नगरसेवकांमुळे माजी नगराध्यक्ष उषा राऊत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नगरसेवकांची कोंडी झाली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे बंडखोरी केलेल्या नगरसेवकाकडे गटनेतेपद कायम राहिल्याने आमदार रोहित पवार गटांच्या सर्व नगरसेवकांना व्हिप बजावता येणार आहे. नगराध्यक्षाच्या पदाच्या निवडीत व्हिप विरोधात मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांना अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. या कोंडीवर आमदार रोहित पवार गटाकडून काय तोडगा काढला जातो, याकडे आता लक्ष लागलं आहे.
कर्जत नगरपंचयातीमधील सत्तांतर नाट्य घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटाची नगरपंचायतीवर एक हाती सत्ता होती. पण त्या सत्तेला भाजपचे विधान परिषदेचे आमदार तथा सभापती प्रा. राम शिंदे यांनी सुरूंग लावला. उषा राऊत यांच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणला. सत्ताधारी गटातील राष्ट्रवादीचे आठ, काँग्रेसच्या तीन आणि भाजपचे दोन, अशा 13 नगरसेवकांनी वेगळी मोट बांधत, सत्ता स्थापनेचा दावा केला.
प्रा. राम शिंदेंनी (Ram Shinde) बंडखोर नगरसेवकांच्या दाव्याला छुपं बळ मिळालं. त्यानंतर ते पुढे जाऊ उघड झालं. यात उषा राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येत नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत, राम शिंदेंवर घणाघाती टीका केली. आमदार रोहित पवार यांच्या गटाकडे गटनेता एवढंच हत्यार होतं. यातून बंडखोरांना जेरीस आणण्याची रणनीती होती. पण, आता त्या रणनीतीला देखील धक्का बसला आहे.
आमदार रोहित पवार गटाने कर्जत नगरपंचायतीचा राष्ट्रवादीचा गट नेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे होती. अमृत काळदाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्याची कार्यवाही व्हावी, अशी ही मागणी होती. यावर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादीची मागणी फेटाळली. याचबरोबर गटनेता म्हणून संतोष मेहत्रे अन् उपनेता म्हणून सतीश पाटील यांची असणारी नेमणूक कायम ठेवली गेली.
या आदेशानुसार आमदार रोहित पवार गटाची कर्जत नगरपंचायतीमधून सत्तेला जवळपास सुरूंग लागल्याचे निश्चितच झाले आहे. संतोष मेहत्रे यांनी गटनेता म्हणून, कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना व्हिप बजावता येणार असून त्यानुसार नगरसेवक सदस्यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मतदानाला समोरं जावं लागणार आहे. व्हिप विरोधात मतदान केल्यास संबंधितांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्याबरोबर असलेले नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.