Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat On Sangrambapu Bhandare : शाई फेकीवरून जुंपली! जगतापांनी संग्रामबापू भंडारेंचं समर्थन करताच, थोरातांकडून लवांडेंच्या धाडसाला सलाम

NCP MLA Sangram Jagtap backed Sangrambapu Bhandare ink attack controversy, Congress Balasaheb Thorat praised Vikas Lawande facing attack fearlessly. : शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर हल्ला करणारे संग्रामबापू भंडारे यांच्या कृत्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Vikas Lawande ink attack : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हभप संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी शाई फेक केली. संग्रामबापू भंडारे यांच्या या कृतीचं राज्यभरातून निषेध होत असतानाच, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भंडारे यांच्या हल्ल्याचं उघडपणे समर्थन केले.

आमदार जगताप यांच्याकडून समर्थन होत असतानाच, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विकास लवांडे यांच्यावरील हल्लाला भ्याड म्हणत, ते धाडसाने या हल्ल्याला समोरे गेले म्हणून अभिनंदन केलं आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "दुर्दैवी गोष्ट आहे. विकास लवांडे यांच्यावर हा भ्याड हल्लाच होता. परंतु त्यांचे मी अभिनंदनच करेल, कारण की, विकासदादा देखील धाडसाने या प्रसंगाला समोरे गेले." संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी, अशा प्रसंगांना समोरे जाण्याचं शिकवलं आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्याकरता, ते लढत आहेत. मेहनत घेत आहेत. अशांवरच हल्ले होत आहे, असेही थोरात यांनी म्हटलं.

'प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला झाला होता. हनुमंत पवार यांच्यावर देखील हल्ला झाला. आता शरद पवार राष्ट्रवादीचे (NCP) विकासदादा लवांडे यांच्यावर हल्ला झाला. प्रतिवाद करण्याची गरज आहे. तशी संधी आहे. आम्ही कसे खरे वारकरी आहोत, हे सांगितलं पाहिजे. असे असताना हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे', असा घणाघात थोरात यांनी केला.

'दुर्दैवानं हे सरकार, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खूपच दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणारं आहे. वारकरी संप्रदायाने याबाबत जागरूकपणे राहिलं पाहिजे. प्रतिवाद करावं, पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे,' असेही थोरात यांनी पुढे म्हटलं आहे.

लवांडेंवर कसा झाला हल्ला

आळंदीवरून प्रवचन उरकून निघालेले विकास लवांडे त्यांच्या वाहनातून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या मागून तीन-चार गाड्या एकदम आल्या, त्यांच्या वाहनाला या गाड्या आडव्या झाल्या. यानंतर त्यांना पकडून गाडीतून खाली उतरवलं, आवड्या गाड्यांमधील एकीतून संग्रामबापू भंडारी, उरळी कांचनमधील अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक आणि इतर अनोळखी व्यक्ती खाली उतरले.

रिव्हाॅल्व्हर दाखवत मारण्याची धमकी

गाडीतून उतरलेल्यांनी धक्काबुक्की करत विकास लवांडेंना स्मशानभूमीच्या शेजारी नेलं, तिथे त्यांना रिव्हाॅल्व्हर दाखवली गेली. आवाज करायचा नाही वगैरे म्हणत, तुझा खात्मा करणार आहोत, अशी धमकी देत, आमच्या गुरूला तू का बोललास, असे म्हणत लवांडे यांच्या अंगावर धावून आले. यानंतर संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या ओतल्या. आजूबाजूचे लोक जमायला लागल्यावर ते लोक पळून गेले, तुझा खात्मा करणार, सावध राहा, अशा धमक्या दिल्याचे विकास लवांडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT