Ahilyanagar voter list complaint Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP officer voter list update issue : महापालिकेची मतदार यादी बनवतोय भाजपचा पदाधिकारी; खळबळजनक प्रकाराची थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

Ahilyanagar BJP Officer Updating Voter List, Complaint Filed : मतदार याद्यांचा घोळाचा मुद्दा संवेदनशील बनला असतानाच, अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीविषयी गंभीर आरोप करणारी तक्रार समोर आली आहे.

Pradeep Pendhare

BJP voter list printing controversy : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अहिल्यानगरमधील प्रशासनाच्या वेगवान हालचाली सुरू आहेत. यातच महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा मुद्दा संवेदनशील ठरला आहे.

अशातच महापालिकेने मतदार याद्या छपाईचं काम सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्याला दिल्याचं खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराविषयी सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

साडेतीन वर्षांपासून राज्यातील महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. अहिल्यानगर महापालिकेमध्ये देखील याचपद्धतीने कामकाज सुरू आहे. या प्रशासकीय कारभाराविषयी वेळोवेळी अनेक तक्रारी झाल्यात. नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. परंतु मतदार याद्यांचा (Voter) गोंधळ देशपातळीवर गाजतो आहे.

अशातच अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने भाजप (BJP) पदाधिकाऱ्याकडेच मतदार माहितीची गोपनीय यादी तयार करण्याचे काम दिल्याचे समोर आला आहे. त्यामुळे मतदार यादीच्या प्रक्रियेवर आणि तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी नितीन भुतारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी महापालिकेला व संबंधित विभागांना बीएलओ नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार तपशील तसेच नव्याने 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांची नावे समाविष्ट करण्याची जबाबदारी बीएलओंवर होती. प्रत्यक्षात ही संपूर्ण माहिती एकत्र करून ती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच करणे व हा डाटा एकत्रित करून प्रभाग निहाय मतदार यादी बनविणे छपाई करून घेणे, ही सर्व कामे गोपनीयपद्धतीने केली जातात.

पण, अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीत नियम धाब्यावर बसवत, मागील महिनाभरापासून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मतदार यादी तयार करण्याचे व छपाई करण्याचे काम महापालिकेने व संबंधित निवडणूक प्रक्रिया अधिकाऱ्याने दिल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे. यामुळे अहिल्यानगर शहरातील इच्छुक, उमेदवार तसेच भाजपचे विविध पदाधिकारीही त्या व्यक्तीच्या संपर्कात असून, मतदार यादी प्रक्रियेतील गोपनीयता धुळीत मिळाल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला.

सौदाबाजीचा गंभीर आरोप

“ही माहिती कोणत्याही व्यक्तीकडे पोहोचणे म्हणजे भविष्यात दबावाचे, सौदाबाजीचे किंवा भ्रष्टाचाराचे दार खुले ठेवणे होय. प्रशासनाने यामध्ये गंभीर दुर्लक्ष केले असून हा प्रकार थेट भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारा आहे,” असा आरोप नितीन भुतारे यांनी केला. या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मदतीने महायुतीतील इच्छुक उमेदवारांनी अनेक प्रभागात मतदारांच्या नावांची फेरफार केल्याचे समजते, असाही दावा नितीन भुतारे यांनी केला आहे.

यादी रद्द करण्याची मागणी

दरम्यान, या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे नितीन भुतारे यांनी केली आहे. तसेच 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी रद्द करून, नव्याने तयार करण्यात यावी, अशीही मागणी नितीन भुतारेंनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT