Abhishek Kalamkar case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Abhishek Kalamkar case : अहिल्यानगरच्या माजी महापौरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; नोकरीसाठी शरीराचा सौदा करायला लावल्याचा आरोपाने खळबळ, राजकीय दबावाचा वास?

Ahilyanagar NCP Leader Abhishek Kalamkar Booked in Rape Case : अहिल्यानगर शहरातील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरोधात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar rape case : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शाळेत नोकरीला लावून देतो, असे अमिष दाखवून, वारंवार अत्याचार केल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.

पीडित युवतीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. अभिषेक कळमकर हा पसार झालेला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याविरोधात अभिषेक कळमकर याने शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. हा गुन्हा दाखल झाल्याने अहिल्यानगरमधील राजकारणात खळबळ उडाली आहे.

पीडित युवती ही शिरूर तालुक्यातील असून, एमआयडीसी पोलिसांकडे तिने आज पहाटे येऊन तक्रार दिली. पीडित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे की, तीन महिन्यापूर्वी नोकरीच्या शोधात अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) आले. तिथं अभिषेक कळमकर याच्या सोशल मीडियावरून संपर्क क्रमांक मिळवत संपर्क केला. परिस्थिती सांगून, नोकरीची गरज असल्याचे सांगितले. दोन-तीन दिवसांनी कुष्ठधाम रोडवर इथं भेटायला मिळवले. तिथं कागदपत्र घेत, एमआयडीसीत माझी शाळा आहे, तिथं कामाला लावून देतो, असे सांगितले.

शाळा (School) बघण्यासाठी बोलवल्यानंतर, तिथं पीडित युवती आला. या वेळी पीडित युवतीला केडगाव बायपासला उतरवले. अभिषेक कळमकर हा तिथं अलिशान वाहनातून येऊन, मला घेऊन विळद घाट इथं गेला. गाडीत आम्ही दोघे होतो. तिथं गाडी हायवे लगत थांबवून थंडपेय दिले. थंड पेय पिल्यानंतर गुंगी आली. त्यावेळी कळमकर हा आपल्याला स्पर्श करत होता. तिथं वाहनात माझे कपडे काढून जबरदस्ती केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर आपण खूप घाबरले होते. झालेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी अभिषेक कळमकर याने व्हाॅट्सअपवर व्हिडिओ काॅल करून, कपडे काढण्यास सांगितले. विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून व्हिडिओ काॅलचे स्क्रिन रेकाॅर्डिंग केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

पीडितेसह तिच्या मुलीला मारण्याची धमकी

यानंतर अभिषेक कळमकर याने 18 फेब्रुवारीला कागदपत्र घेऊन शिरूर इथल्या मारवेल हाॅटेलवर बोलावलं. नोकरीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून कळमकर याने एका व्यक्तिसोबत हाॅटेलमधील रूम नंबर 110 मध्ये पाटवले. तो व्यक्ती तिथून गेल्यावर अभिषेक कळमकर तिथे आला अन् माझ्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या प्रकाराचे व्हिडिओ देखील काढले. या शरीर संबंधाच्या कोणाला सांगितल्यास, मला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांनी कळमकर याच्या शोधात तपास सुरू केला आहे.

कळमकराविरोधात अपहरणाचा गुन्हा

अभिषेक कळमकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील त्याच्याविरोधात गुन्हा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्याच वाहनावरील चालकाला अपहरण करून, डांबून ठेवत, नोटरीवर बळजबरीने सह्या घेतल्याचा गुन्ह्याची नोंद आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झालेली आहे. आता थेट बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते

अभिषेक कळमकर याचे चुलते दादाभाऊ कळमकर हे माजी आमदार आहेत. शरद पवार यांचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत. या काका-पुतण्यांकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगर जिल्ह्यात अन् शहरात जबाबदारी आहे. दोघे विद्यमान पदाधिकारी आहेत. याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात अभिषेक कळमकर याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढत दिली होती.

जगतापविरुद्ध कळमकर

या लढतीत संग्राम जगताप यांना 1 लाख 17 हजार 55 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर याला पराभव झाला. कळमकर याला 78 हजार 255 मते मिळाली. आमदार जगताप यांचा 39 हजार 650 मतांनी विजय झाला. आमदार जगताप यांची विजयाची ही हॅटट्रिक झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT