Ahilyanagar news : 30 वर्षे वीटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने जिद्दीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेतून यशाला गवसणी घातली.
पाथर्डी (जि. अहिल्यानगर) जवळवाडी इथल्या ज्ञानेश्वर जगन्नाथ गोल्हार याने नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेतून कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली. ज्ञानेश्वरच्या या यशाबद्दल गोल्हार ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढत कौतुक केलं.
ज्ञानेश्वर याचे वडील जगन्नाथ व आई कांताबाई हे दोघे वीटभट्टीवर 30 वर्षांपासून काम करतात. त्याला चार बहिणी. चार मुली व एका मुलाचा संसार चालवताना गोल्हार दाम्पत्याची खूपच दमछाक झाली. मुलींना शिकवता आले नाही. मात्र, ज्ञानेश्वरला पोटाला चिमटा घेत शिक्षणाच्या (Education) प्रवाहापासून कधीही दूर ठेवलं नाही.
ज्ञानेश्वर पहाटे पाच वाजता अभ्यासाला उठायचा. शाळेच्या (School) सुटीच्या दिवशी ज्ञानेश्वर आई-वडिलांना मदत करायचा. त्याच्या बहिणी सुद्धा आई वीटभट्टीवर काम करण्यासाठी जायच्या. साडेतीन एकर जमीन. दिवसा वीटभट्टीवर काम करून शेतातही राबायचे. घरची आर्थिक परिस्थिती खडतर.
वेळप्रसंगी आठवडे बाजारही करता यायचा नाही. आईवडिलांचा, बहिणींचा हा संघर्ष, ज्ञानेश्वरने पाहत होता. त्यातूनच त्याने खूप अभ्यास केला. यातून स्पर्धा परीक्षेला सामोरे जात, ज्ञानेश्वरने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. ज्ञानेश्वर सनदी अधिकारी झाल्याचे समजताच जवळवाडी ग्रामस्थांनी खरवंडी कासार, तर जवळवाडी, अशी त्याची सवाद्य मिरवणूक काढत त्याचा सत्कार केला. या सत्काराने कुटुंबीय भारावून गेले.
ज्ञानेश्वर गोल्हार याने, या यशावर प्रतिक्रिया देताना म्हटला, कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचेच ही प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाली. त्यांनी अत्यंत कष्ट करत मला शिकण्याची व मोठा अधिकारी होण्याची प्रेरणा दिली. वयाच्या तेराव्या वर्षी सुद्धा मी व माझ्या बहिणी आई-वडिलांसोबत मदत करण्यासाठी वीटभट्टीवर काम करण्यासाठी जात होतो. कोणत्याही परिस्थितीत मोठे यश संपादन करून आई-वडिलांच्या कष्टाला पूर्णविराम देण्यासाठी अधिकारी व्हायचे हे ठरवले होते. ते स्वप्न पूर्ण झाले. माझ्या यशात आई-वडील, बहीण आणि सर्व गुरुजनांचा मोठा वाटा आहे, अशी भावनात्मक प्रतिक्रिया दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.