Laxman Hake speech Gopinath Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Laxman Hake speech Gopinath Munde : शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा, तरी जीवघेणा हल्ला; लक्ष्मण हाके म्हणाले, 'ओबीसींसाठी संघर्षाचा काळ, गोपीनाथ मुंडे...'

Ahilyanagar Pathardi Nandur nimbadaitya OBC Sabha Laxman Hake Remembers Gopinath Munde : अहिल्यानगरच्या पाथर्डी इथं भर पावसात झालेल्या ओबीसींच्या सभेत, लक्ष्मण हाकेंना (कै.) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली.

Pradeep Pendhare

Laxman Hake Ahilyanagar : अहिल्यानगरमधील बायपास रोडवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर देखील लक्ष्मण हाके यांनी पाथर्डी तालुक्यातील नांदूर निंबादैत्य इथली सभा भर पावसात गाजवली.

शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त असताना, देखील जीवघेणा हल्ला झाला. पण ओबीसींसाठी संघर्षाचा काळ असल्याचे सांगताना (कै.) लोकनेते गोपीनाथ मुंडे पाहिजे होते, हे सांगताना लक्ष्मण हाके या सभेत काहीसे भावूक झाले.

अहिल्यानगरमध्ये सकाळपासून पावसाचा जोर आहे. यातच पाथर्डी इथल्या नांदूर निंबादैत्य इथं ओबीसींसाठी सभेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातून चालले होते. त्याचवेळी अहिल्यानगर शहरालगत असलेल्या अरणगाव बायपास रोडवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर देखील लक्ष्मण हाके यांनी नांदूर निंबादैत्य इथली सभा भर पावसात गाजवली.

लक्ष्मण हाके म्हणाले, "अहिल्यानगर बायपास रोडवर आमच्यावर भ्याड हल्ला झाला. माझ्याबरोबर पुढे अन् मागे पोलिसांची (Police) वाहने आहेत. शस्त्रधारी पोलिस आहेत. तरीही माणसांनी न घाबरता वाहनार हल्ला केला. त्यामुळे यांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही." या हल्लावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देतानी स्वतःच्या वाहनांवर हल्ला करून घेण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप केला. या हल्ल्यानंतर काहीच वेळात गोरख दळवी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले.

'आम्ही संविधानात मार्गाने हक्क आणि अधिकाऱ्यांची भाषा बोलतो आहोत. पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षांमधील नेते, ओबीसी नेते, प्रत्येक आमदार, खासदारांना विनंती आहे की, आजरोजी आमचे ओबीसींचे आरक्षण गेले आहे आणि त्यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही ओबीसींची पोर बोलायला लागलो आहोत, तर आमच्यावर हल्ले होत आहेत,' असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.  

'मुख्यमंत्री यांनी ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण केलेले नाही. आतापर्यंत नऊ हल्ले झाले आहेत. आता नितीन जगताप नावाच्या पोरानं विजयसिंह पंडित यांना पोस्ट करताना, साहेब मला तुम्ही काम देऊ नका, पण लक्ष्मण हाकेला ठोकण्याची एक संधी द्या, अशी भाषा वापरली आहे. आता माझ्या वाहनावर हल्ला झालाय, त्यात दोन मुलं जखमी झाली आहेत. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली असली तरी, त्याला सोडण्यासाठी हे सगळे जण पोलस ठाण्याला जाऊन बसलेत,' असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी केला.  

गोपीनाथ मुंडेंची आठवण...

'भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिले. पण मुख्यमंत्र्यांनी ते घालवले आहे. सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. एकमेव लोकनेते गोपीनाथ मुंडे हे आपल्या बाजूने ताकदीने उभे राहत होते. पण हा माणूस आज आपल्यात नाही, हा माणूस जिवंत असता, तर या संघर्षाच्या काळात महाराष्ट्रातील ओबीसींवर ही वेळ आली नसती,' असं दावा करताना लक्ष्मण हाके गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने काहीसे भावूक झाले.

ओबीसी एक झाला पाहिजे

'गोपीनाथ मुंडे म्हणजे, भगवानगडावर ऊसतोड मजुराच्या खांद्यावर हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपतींचे वंशज उदयनराजेंच्या खांद्यावर हात ठेवून, राजे मी तुम्हाला आमदार करतोय, राजे मी मंत्री करतोय, हे सांगण्याचा कारण म्हणजे ओबीसी एक झाला पाहिजे,' असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

मंत्री विखे पाटलांवर टिका

नीलेश लंके आत्ताचे खासदार आहे, त्या अगोदरचे खासदार सुजय विखे पाटील होते. विखे पाटलांनी काय केलं ते सांगतो, असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. विखे पाटील यांची पाचवी पिढी राजकारणात आहे. सहकारापासून ते शैक्षणिक संस्थ पर्यंत सर्वकाही त्यांच्या ताब्यात आहे. सर्व काही ताब्यात असताना यांनी ओबीसींची आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणून बसवलं, असे गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी मंत्री विखे पाटलांवर केला.

आर्थिक निकषावरून जोरदार टिका

यामहाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, खासदार, आमदार, दोनशेच्यावर कारखाने तुमच्याकडे आहेत. सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार, मराठा समाज ओबीसीमध्ये समाजात आल्यास या गावगाड्यामध्ये ओबीसी समाज स्पर्धेत टिकेल काय? असा प्रश्न करताना, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देण्याच्या भाष्यावर लक्ष्मण हाकेंनी जोरदार टिक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT