Ahilyanagar latest crime news : शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहिल्यानगरमधील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगाव इथं हा प्रकार घडला. संगमनेरच्या घारगाव पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद घेत, पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. अमोल भोसले, असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पीडिता ही घारगाव (ता. संगमनेर) इथल्या एका खासगी संस्थेच्या माध्यमिक शाळेत (School) आठवीच्या वर्गात आहे. पीडितेची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे पीडितावर देखील त्याचा मानसिकदृष्ट्या परिणाम झालेला होता. इतर मुलींमध्ये ती जास्त मिसळत नव्हती. ती एकटीच राहायची. याचाच फायदा शिक्षक अमोल भोसले याने घेतला.
पीडित विद्यार्थिनीच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत, अमोल भोसले याने तिच्याशी जवळीक वाढवली. त्यावेळी पीडिता ही सातवीत होती. यातून अमोल याने पीडिताशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान वेळोवेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.
जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा अमोल तिच्या घरी जाऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा. गेल्या दोन वर्षांपासून चाललेला हा गंभीर प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिला तिच्या कुटुंबियांनी पिंपरी-चिंचवड इथल्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.
तिथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत पीडिता ही गर्भवती असल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी आरोपी अमोल भोसले याच्यावर भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलम आणि पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिपंरी चिंचवड पोलिसांनी पीडितेची झिरो क्रमांकाने तक्रार घेत, तो पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांकडे तत्काळ वर्ग केला. घारगाव पोलिसांनी तातडीने शिक्षक अमोल भोसले याला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.