Puntamba Farmers Strike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Puntamba Farmers Strike : पुणतांब्यातील शेतकरी संपाची ऐन दिवाळीत आठवण! उसाला चार हजारांहून अधिक दराची मागणी, सरकारवर दबाव

Farmers Puntamba have warned fresh agitation demanding over Rs 4000 per tonne sugarcane, recalling Maharashtra historic farmers strike : देशातील पहिल्या शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांब्यात पुन्हा आंदोलनाचे संकेत; कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या धर्तीवर उसाला भाव देण्याची मागणी

Pradeep Pendhare

Maharashtra Sugarcane Farmers : उसाच्या दरवाढीवरून, केंद्र व राज्यातील सरकाराविरोधात शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा संघर्ष सुरू आहे. यातच केंद्र सरकारने प्रति टनासाठी 3650 रुपये भाव जाहीर केला आहे. या भावावर ऊस उत्पादक शेतकरी समाधानी नाही.

देशात शेतकऱ्यांचा पहिला संप करणाऱ्या राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे पुन्हा एकदा संपाची आठवण करून देत, उसाला प्रति टन पाच हजारांहून अधिकचा भावाची मागणी करण्यात आली. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी ही आठवण करून दिल्याने, शेतकरी आणि शेतकरी संघटना सरकारविरोधात उसाच्या दरासाठी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शेतकरी (Farmer) पुतळ्यासमोर उसाला चार हजारांहून अधिकचा भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी ऊस भावासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चव्हाण, अशोक धनवटे, गोकुळ बोर्डे, अशोक कुलकर्णी, चांगदेव धनवटे यांच्यासह शेतकरी ऊस दरवाढीवर आक्रमक झाले होते.

शरद पवार राष्ट्रवादीचे (NCP SP) जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, "याच पुणतांबा गावाने देशात पहिली शेतकरी संपाची हाक देऊन इतिहास घडविला आहे. या शेतकरी संपाच्या आंदोलनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 35 हजार कोटी रुपयांची पहिली कर्जमाफी मिळाली."

राज्यामध्ये उसाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले. शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला 4 हजार 200 रुपये भाव जाहीर झाल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

उसाला पश्चिम महाराष्ट्रासारखाच भाव हवा

आज साखरेचे भाव 70 ते 80 रुपये किलो झाले आहे. मग येथील शेतकऱ्यांनी का म्हणून कमी भाव घ्यावा? स्थानिक कारखान्यांनी 3000 ते 3300 रुपये भाव जाहीर केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गावर अन्याय का केला जातो? हा दुजाभाव कशासाठी? असे प्रश्न करत आता आम्हाला देखील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच उसाला चार हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

138 साखर कारखान्यांची धुराडी पेटली

महाराष्ट्रातील 2026-27 च्या गाळप हंगामासाठी राज्यातील एकूण 200 परवानाधारक साखर कारखान्यांपैकी 138 साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. 138 कारखान्यांमध्ये 64 सहकारी आणि 74 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. 1 कोटी 32 लाख 7 हजार टन उसाचे एकूण गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT