Nitin Shete Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shani Shingnapur Trust officer death : शनिशिंगणापूर हादरलं; भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फेऱ्यातील 'शनैश्वर देवस्थान'च्या नितीन शेटेंनी घेतला गळफास

Ahilyanagar Shanishingnapur Shaneshwar Trust Officer Nitin Shete Found Dead : शनिशिंगणपूर इथल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेतला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar breaking news : अहिल्यानगरमधील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील तब्बल ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार, पाच बनावट अ‍ॅपद्वारे भाविकांची फसवणूक, अवाजवी नोकर भरती, अशा सर्व आरोपांचा चौकशी सुरू असताना, देवस्थान ट्रस्टचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांचा मृत्यूच्या बातमी शनिशिंगणापूर हादरलं आहे.

उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे राहत्या घरात गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेत, चौकशी सुरू केली आहे. घोटाळ्याची चौकशी सुरू असताना, नितीन शेटे यांच्या अशा प्रकाराने मृत्यूने वेगवेगळ्या चर्चाना तोंड फुटले आहे.

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर (Shanishingnapur) देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला दोरी बांधून गळफास घेतला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे देवस्थानच्या विश्वस्त बाॅडीवर होते. विश्वस्त पदाचा राजीनामा देत त्यांनी देवस्थानच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले.

नितीन शेटे यांनी गळफास का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठवला आहे. या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच नितीन शेटे यांनी गळफास का घेतला, याचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांना आकस्मान मृत्यूची नोंद घेतली आहे.

मुंबईच्या पावसाळी अधिवेशनात शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचार चांगलाच गाजला. आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी लक्षवेधी मांडली. देवस्थान ट्रस्टमध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. पाच बनावट अ‍ॅपद्वारे देशभरातल्या लाखो भाविकांची लूट केली गेली. अवाजवी भरती दाखवली गेली. अशा वेगवेगळ्या मुद्यांवर लक्षवेधी मांडत, देवस्थानमधील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले गेले.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या मुद्द्यांची गंभीर दखल घेत फौजदारी कारवाईचे संकेत दिले. यानंतर मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी करत, देवस्थानच्या विश्वस्तांना नोटिसा बजावल्या. अहिल्यानगर पोलिस दलातील सायबर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होती, बनावट अ‍ॅपप्रकरणी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. यामुळे शवैश्वर देवस्थानचा कारभार राज्यात चर्चेला आला आहे.

विश्वस्तांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ

मुंबई इथल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपावर विश्वस्तांना म्हणणे मांडण्याची तारीख वाढवून दिली आहे. तशी विनंती केली होती. शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना 1 ऑगस्ट 2025 ही पुढची तारीख देण्यात आली आहे. यामुळे विश्वस्तांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु माजी विश्वस्त आणि उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे याने गळफास घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून, त्यात देवस्थानमधील भ्रष्टाचाराचा संदर्भ जोडला जात आहे.

शनैश्वरच्या कामगार आंदोलनाच्या तयारीत

शनिशिंगणापूर इथल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टवर कर्मचारी भरती व ऑनलाइन अ‍ॅप गैरव्यवहाराच्या चौकशीचा ससेमिरा सुरू असताना देवस्थानच्या कायम असलेल्या 358 कामगारांनी सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी आमरण साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. चार ऑगस्ट 2025 पासून उपोषणाची तारीख निश्चित केल्याने विश्वस्त मंडळ व अधिकाऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नेवासेचे आमदार विठ्ठल लंघे, जिल्हाधिकारी पंकज आशिया व सर्व प्रशासकीय कार्यालयास देण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र शेटे व सेक्रेटरी अजित शेटे यांचा निवेदनावर उल्लेख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT