Shrigonda land dispute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrigonda land dispute : सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांना मिळणार; न्यायाधिकरणाचा मोठा निकाल

Ahilyanagar Shrigonda SDO Shrikumar Chinchkar Orders Land Returned to In Laws : श्रीगोंद्यातील येवती इथल्या ज्ञानदेव दिनकर आढाव व त्यांच्या पत्नी अंजना या वृद्ध दांपत्याने न्यायाधिकरणाकडे तक्रार केली होती.

Pradeep Pendhare

SDO Shrikumar Chinchkar order : आई -वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी तथा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी येवती (ता. श्रीगोंदा) इथल्या वडिलोपार्जित शेतजमीन प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे.

सुनेकडून, परत वृद्ध दांपत्याच्या नावे करण्याचा महत्त्वाचा आदेश दिला आहे. तहसीलदारांना अभिलेखात नोंदी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

येवती इथल्या ज्ञानदेव दिनकर आढाव व त्यांच्या पत्नी अंजना या वृद्ध दांपत्याने न्यायाधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यांचा मुलगा विजय आढाव याचा 20 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर सून जयश्री आढाव हिने त्यांचा अडाणीपणा व वृद्धत्वाचा गैरफायदा घेत प्रतिज्ञापत्र करून वडिलोपार्जित शेतजमीन (Farmer) आपल्या नावावर करून घेतली.

सून जयश्री हिने यानंतर त्या दोघांना घराबाहेर काढून त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी उरली नाही. वृद्ध दांपत्याने मुलींच्या घरी आश्रय घेत हालाखीचे जीवन कंठत असल्याचे अर्जात नमूद केले होते. सून जयश्री आढाव हिने मात्र आपल्याला ही जमीन कायदेशीर वाटपातून मिळाल्याचा दावा केला अन् वृद्धांच्या आरोपांना विरोध केला. यापूर्वीही तिने अशा बाबींवर न्यायालयीन (Court) लढा दिल्याचे सांगितले.

दोन्ही बाजूंचे म्हणणे व पुरावे तपासल्यानंतर न्यायाधिकरणाने जेष्ठ नागरिक (देखभाल व कल्याण) कायदा 2007च्या कलम 23चा आधार घेत, सुनेच्या नावे झालेले हस्तांतरण अवैध ठरवले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरद दीक्षित या प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ देत, वडिलोपार्जित शेतजमीन परत ज्ञानदेव आढाव यांच्या नावे नोंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.

सदर आदेश जिल्हा व सत्र न्यायालयात चालू असलेल्या अपील क्रमांक 19/2024 च्या निकालाच्या अधीन राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीगोंद्यातील या निर्णयामुळे वृद्ध नागरिकांच्या मालमत्तेवरील हक्कांना न्याय मिळाला असून, भविष्यात अशा प्रकरणांसाठी हा आदेश मार्गदर्शक ठरणार आहे ‌.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT