Shrirampur Hindu Raksha Kruti Samiti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur Hindu Raksha Kruti Samiti : पालकमंत्री विखेंची प्रकाश चित्तेंच्या 'मशाल मोर्चा'मुळे अडचण; 'राजकीय सोय' डोकेदुखी ठरणार?

Hindu Raksha Kruti Samiti Morcha Against Radhakrishna Vikhe Shivaji Statue Relocation in Shrirampur Ahilyanagar : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची जागा बदलल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षा कृती समितीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा काढण्यात आला.

Pradeep Pendhare

Shrirampur political news : सरलापिठाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थित श्रीरामपूर इथं भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केले.

परंतु वर्षभरानंतर राजकीय सोयीसाठी छत्रपतींच्या पुतळ्याची अचानक जागा बदलण्यात आली. यासाठी पुन्हा भूमिपूजन देखील करण्यात आले. हा केवळ मुस्लिमांच्या मतांकरिता मंत्री विखेंनी हिंदू समाजाचा केलेला विश्वासघात असून जनता विसरणार नाही, असा घणाघात हिंदू रक्षा कृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची जागा बदलल्याच्या निषेधार्थ व छत्रपतींचा पुतळा श्री शिवाजी महाराज चौकातच उभारावा, या मागणीसाठी हिंदू रक्षा कृती समितीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे पुढं जाहीर सभेत रुपांतर झाले. सुदाम महाराज चौधरी अध्यक्षस्थानी होते. आचार्य महेशजी व्यास, हिंदू (Hindu) जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरेगावकर, सेवालाल महाराज, ऋषिकेश महाराज, भाजपचे माजी शहराध्यक्ष संजयजी पांडे उपस्थित होते .

श्रीरामपूरच्या (Shrirampur) छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बांधकाम रेषेच्या नियमाची अडचण आहे, असे सांगतात. मग चाळीसगाव आणि तासगाव या तालुक्याच्या गावांमध्ये भर चौकामध्ये नॅशनल हायवेवर कायदेशीररित्या परवानगी घेऊन पुतळ्यांची प्रतिष्ठापना कशी झाली? असा सवाल प्रकाश चित्ते यांनी यावेळी केला.

श्रीरामपूरच्या शिवाजी महाराज चौकातही त्याचपद्धतीने मार्ग काढून पुतळा बसवला जाऊ शकतो. मात्र चौकात पुतळा बसवायचा नसेल, तर हिंदू समाजाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने लढावे लागेल, असा इशारा प्रकाश चित्ते यांनी दिला.

आचार्य महेशजी व्यास यांनी मंत्री विखेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी, सुरुवातीला चौकात भूमिपूजन केले आणि अचानक छत्रपतींच्या पुतळ्याची जागा बदलली, हा हिंदू समाजाचा व महंत रामगिरीजी महाराज आणि सरलापिठाचा अपमान आहे. ही घटना हिंदू समाज सहन करणार नाही, असा घणाघात केला.

हिंदू जनजागृती समितीच्या प्रतीक्षा लोणकर यांनी राजाच्या स्मारकाची श्रीरामपूरमध्ये हेडसाळ होत आहे. स्मारकासाठी श्रीरामपूर 40-40 वर्ष लढा उभारावा लागतो. हे या महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे दुर्दैव असल्याचे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT