Sujay Vikhe Patil ZP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar ZP Election : झेडपीत 60 जागा जिंकणार, भाजपचे अध्यक्षपद फिक्स; नगरसेवकांवर निवडणुकीची जबाबदारी देण्याचे सुजय विखेंचे संकेत

Sujay Vikhe Patil signals BJP's ZP election push, targeting 60 of 75 seats in Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नगरसेवकांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे डाॅ. सुजय विखे पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Zilla Parishad Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजेल असे चिन्हे आहेत. सध्या पन्नास टक्के आरक्षणाच्या निकषामुळे जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुका रेंगाळलेल्या आहेत.

असे असले तरी भाजपकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानातून दिले.

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार अहिल्यानगर येथे आयोजित पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर मोठे भाष्य केले. तत्पूर्वी या बैठकीला गैरहजर राहिलेले नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे 25 नगरसेवक निवडून आल्याचा उल्लेख करत डॉ. विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी पक्षाची संघटनात्मक ताकदीकडे लक्ष वेधले. हीच ताकद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पूर्ण क्षमतेने काम करा, असे सांगताना त्यांनी महापालिकेतील नगरसेवकांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची जबाबदारी येणार असल्याचे संकेत दिले.

जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष

महापालिकेतील नगरसेवकांवर येणार असल्याचे जबाबदारीचे संकेत देताच, जिल्हा परिषदेत 75 पैकी 60 जागा भाजप जिंकेल असे सांगत अध्यक्षपदही भाजपकडे येईल, असे विश्वास डाॅ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. डाॅ. विखे पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकप्रकारे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचा बिगूल फुंकला.

व्यग्र नगरसेवकांवर विखेंची टोलेबाजी

गैरहजर नगरसेवकांवर बोलताना, डाॅ. विखे पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. नगरसेवक व्यवसायात व्यग्र आहेत. काहीजण प्लाॅट पाडतात. काहींच्या हाॅटेलवर धाडी पडल्यात. काहींची हाॅटेल सील झाली आहेत. त्यामुळे ते कदाचित आले नसतील. पण हे चुकीचे आहे, अशा शब्दात डाॅ. विखे पाटील यांनी सुनावले.

पक्षासाठी वेळ नाही, त्यांना बळ नाही

नगरसेवक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद हे पक्षामुळए मिळाले हे विसरू नका. पालकमंत्री यांनी निरोप दिला आहे. जो पक्षासाठी वेळ देईल, त्याला पक्षाचे पद अन् सन्मान मिळेल. पक्षासाठी ज्याकडे वेळ नाही, त्याला पक्षाचे नेतृत्व बळ देणार नाही, असा डाॅ. विखे पाटील यांनी इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT