Rohit Pawar Karjat Jamkhed meeting : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात आमसभा घेतली. मतदारसंघातील विविध मुलभूत कामांसंदर्भात ही आमसभा होती. या आमसभेत एका अधिकाऱ्यावर रोहित पवार चांगलेच संतापले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत डिवचलं आहे. 'जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा?', असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला आहे.
रोहित पवार यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर (Social Media) शेअर करताना, अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट होत असतात, यात काहीच शंका नाही. यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला पाहिजे यातही काही शंका नाही, पण ही भाषा? असा सवाल केला आहे.
'अधिकाऱ्यांना म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, काय गोट्या खेळत होता काय?, खिशातून हात काढ, मिजासखोर तू बोलू नकोस तुला सांगतोय, हे शब्द रोहित पवार (Rohit Pawar) लोकांदेखत अधिकाऱ्यांना बोलतात. परंतु ही कामे स्वतः पाहून त्या कामाची आणि त्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणं योग्य आहे. पण सार्वजनिक अपमान करणं शोभतं का?' असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पोस्टच्या सुरवातीला जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा? असा टोला लगावला आहे. अंजली दमानिया यांनी अशी कमेंट करत रोहित पवार यांच्याबरोबर अजित पवार यांना देखील डिवचलं आहे. अजित पवार संतापल्यावर काय बोलतील याचा नेम नसतो. तसंच रोहित पवार यांच्याबाबत आमसभेत झाल्याचे दिसतं आहे. व्हिडिओत नेमकं काय बोलले आहेत, ते बातमीत देखील दिलं आहे. एकंदर रोहित पवार यांची अधिकाऱ्यांविषयी बोलताना जीभ घसरल्याचे दिसते.
कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामकाजाच्या आढाव्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आमसभा आयोजित केली होती. या आमसभेत अधिकारी आणि नागरिक समोरासमोर आले होते. नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या. यावर अधिकारी मोघम उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले. 'आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?,' अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.
जामखेड शहरातील नागरिकांनी नगरपरिषद संदर्भात सर्वात जास्त तक्रारी आमसभेत केल्या. नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट, कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं.
एका नागरिकाने ड्रेनेज लाईनचा कामाची मुद्दा उपस्थित करत, काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार केली. यावर अधिकाऱ्यांनी संबंधित कामावर दोन कन्सल्टंट नेमले असून, त्यावर लक्ष ठेवले जात आहे, अशी बाजू मांडली. यावर नागरिकांनी मोबाईलमध्ये ड्रेनेज लाइनचा फोटो दाखवला. आम्ही विनाकारण बोलत नाही. तुमचा सुपरवायझर कामावर आहे का? यावर अधिकाऱ्याने सुपरवायझर कामावर असल्याचे सांगितले. 'तुम्ही काम करून बदल्या करून जाताल,' असा सूर संबंधित नागरिकांनी लावला. त्यावर अधिकाऱ्याने आपण खराब काम करत नसल्याचे स्पष्ट केले. तक्रारदार नागरिकाने हे ड्रेनेज लाइन पुढील 30 ते 35 वर्षे होणार नाही. तुमचा सुपरवायझर आहे का? असा प्रश्न केला. यावर अधिकाऱ्याने हा फोटो कधीचा आहे. आपण ड्रेनेज लाइन स्वतः जाऊन पुन्हा पाहू, दोघं जाऊन पुन्हा, असे सांगितले.
यावर आमदार रोहित पवार संबंधित अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? हे फोटो, ही लोकं बावळट आहेत का? ही काय वेडी लोकं आहेत का? खिशातला हात काढ आधी! लय शहाणा काम करतोय तू इथं! मिजासखोर तू बोलू नको सांगतोय, या लोकांनी दाखवलेले काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराबच झालेले आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा आहे. तू कुठलाही असशील, इथं यांना राहायचं आहे. त्यामुळे ही खराब कामं आहे म्हटल्यावर आहेत, लोकांनी दाखवली आहेत. उद्या बघतो, करतो, हे पराक्रम आम्हाला माहिती आहे आणि तुमच्या अधिकाऱ्यांचे देखील माहिती आहे. काम चांगल्या गुणवत्तेचं झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. जास्त अंहकार, 'अॅटिट्युड' दाखवू नको, ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इथं, असले काम चुकार असतील, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी, असा संताप करताना आमदार रोहित पवार व्हिडिओ दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.