Ahmednagar News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
'राहुल गांधी सकाळी एक आणि सायंकाळी एक, असे बोलतात. देशात आणि देशाबाहेर काय बोलावं, याचं देखील त्यांना भान नाही. देशाबाहेर आरक्षण रद्द करण्याची भाषा करणारे, देशात येताच, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची भाषा करू लागले आहे. पण महाराष्ट्रातील जनता काँग्रेस आणि राहुल गांधींच्या फसव्या धोरणांना बळी पडणार नाही', असा विश्वास राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.
भाजप (BJP) नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वेगवेगळ्या विधानांवर निशाणा साधला. मराठा आरक्षण भाजपच देऊ शकते, असा दावा देखील केला. महाविकास आघाडीतील नेते मराठा आरक्षणाविषयी वेगवेगळी विधान करत आहेत, याकडे देखील मंत्री विखे यांनी लक्ष वेधले.
'महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण केंद्राने द्यावे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे म्हणणे आहे. तर शरद पवार यांनी आरक्षण देता येणार नाही, असे म्हणणे. काँग्रेसचे नेते आरक्षणावरून मराठा समाजाबरोबर दिसत नाही. महाविकास आघाडीची आरक्षणाची भूमिका आता उघडी पडू लागली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचा आरक्षणावर अभ्यासच नाही', असा टोला राधाकृष्ण विखे यांनी लगावला.
महाविकास आघाडी राज्यात भकासाचं राजकारण करत आहे. जनतेनं त्यांच्यापासून सावध राहावं. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर महायुती सरकारवर टीका केली. त्यावर मंत्री विखे म्हणाले, "छत्रपतींचा पुतळा पडल्याच्या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. काँग्रेसच्या सत्ता काळात महाराष्ट्रात महापुरूषांचा एकही पुतळा उभारलेला नाही. काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक आणि पंजाबमध्ये महाराजांचा पुतळा का उभारला नाही. आता महाराष्ट्रात महाराजांच्या पुतळ्यावरून भावनिक राजकारण करणं योग्य नाही", असा सल्ला देखील मंत्री विखे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.