Ahmednagar News : बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. तर महायुतीमधील भाजपकडून या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीने ठिकठिकाणी आंदोलन केली. याला भाजपने आंदोलन करत जशास तसे उत्तर दिले.
"महाविकास आघाडीने या घटनेत घाणेरडे राजकारण केले आहे. त्याची फळ त्यांना भोगावी लागतील", असा खणखणीत इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिला.
अभय आगरकर म्हणाले, "बदलापूर अत्याचार घटनेतील नराधमाला शिक्षा झाली पाहिजेच. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही या घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील अशा घटनांबाबत गंभीर्याने हाताळत आहेत. कायद्या सर्व बाजूने पीडित कुटुबाला न्याय देण्यासाठी ते काम करत आहेत".
परंतु महाविकास आघाडीने यात घाणेरडे राजकारण केले. महाराष्ट्र बंद करून ही घटना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रकार केला. महायुती सरकारकडून सुरू असलेल्या चांगल्या योजनांबाबत अपप्रचार या घटनेच्या मागून महाविकास आघाडीत करत आहे. जनेतला देखील हे लक्षात आले आहे. त्यामुळे अशा घाणेरड्या राजकारणाचं फळ महाविकास आघाडीला भोगावं लागेल, असेही अभय आगरकर यांनी म्हटले.
भाजपच्या (BJP) अहमदनगरमधील कार्यकर्त्यांनी बदलापूर अत्याचाराचा निषेध नोंदवत, महाविकास आघाडीच्या कपटी आंदोलनाला अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली जशास तसे उत्तर दिले. "राज्यात महायुती सरकारने विकास कामांची गंगोत्री आणली आहे. प्रत्येक पावलावर सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळतो आहे. महिलांना सर्वाधिक योजना मिळवून देण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना प्रवासात सवलत, अशा अनेक योजनांमुळे महायुतीवर महिलांचा विश्वास वाढत चालला आहे. हेच कुठेतरी महाविकास आघाडीला खटकत आहे आणि त्यातून अपप्रचार करत आहे", अशी टीका अभय आगरकर यांनी केली.
भाजपच्या प्रिया जानवे यांनी राज्यातील महायुती सरकार महिलांप्रती अत्यंत संवेदनशील आहे. सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक चांगल्या योजना सुरू करून अंमलबजावणी केली आहे. महाविकास आघाडी राजकारण करत आंदोलनाची स्टंटबाजी करत आहे. अशा दुर्दैवी घटना कशा थांबतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस सचिन पारखी, महेश नामदे, रेणुका करंदीकर पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.