Uday Shelke
Uday Shelke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Shelke News : अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

उद्या रविवारी (दि.12 फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उदय शेळके (Uday Shelke) यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

यानंतर त्यांना पुणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून ते बेशुद्धावस्थेत होते.

आज (दि.११ फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले. अ‍ॅड.उदय शेळके यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. तसेच शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT